Malaika Arora: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक मलायका अरोरा (Malaika Arora). आज तिला कोणत्यही परिचयाची गरज नाही. ती नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांचे मनोरंजन करत असते. कधी कधी तिच्या बोल्ड फोटोमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जाते. हल्ली मलायका तिच्या 'मुव्हिंग इन विथ मलायका' (Moving In With Malaika) या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. शो सुरू होऊन एक आठवडा उलटून गेला आहे. शोमधील अभिनेत्रीची स्पष्टवक्ते शैली खूपच मनोरंजक आहे, लोक या शोवर भरभरून प्रेम करत आहेत. या शोच्या माध्यमातून अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित किस्से आणि रहस्यांबद्दल मोकळेपणाने बोलत आहे. दरम्यान, त्यांच्या नात्याबद्दलही खुलासे झाले आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये मलायकाने पाहुणे करण जोहरसोबत तिचा माजी पती अरबाजबद्दलही खुलासा केला.
मुव्हिंग इन विथ मलायकाच्या ताज्या भागात, मलायका कुटुंबाबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. करण जोहरने मलायकाशी 2021 मध्ये झालेल्या तिच्या अपघाताविषयी सांगितले. करण जोहर म्हणाला, 'मला आठवतंय जेव्हा मी तुला माझ्यासोबत हॉस्पिटलमधून घरी नेण्यासाठी गेलो होतो, तेव्हा संपूर्ण कुटुंब तुझ्यासोबत उभं दिसलं होतं.' यावर मलायका म्हणाली की ती तिच्या कुटुंबाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कधीच येऊ शकत नाही. माझा मुलगा अरहानमुळे त्यांना माझी काळजी वाटते हेही खरे आहे, जे चांगले आहे.
शो दरम्यान, करण जोहरने मलायकासोबत अरबाज आणि त्याची कथित गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी यांच्यातील ब्रेकअपच्या अफवांवरही प्रांजळपणे चर्चा केली. करणने अभिनेत्रीला विचारले की तिला या प्रकरणाबद्दल काही माहिती आहे का? यावर मलायका म्हणाली की, मला लोकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला आवडत नाही. इतकंच नाही तर मी माझ्या मुलाला त्यांच्या वडिलांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित कोणतेही प्रश्न विचारत नाही. बरेच लोक हे करतात, परंतु मी हे करू शकत नाही. मला ते करण्यात रस नाही. मलायका या शोमधून तिच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक मुद्द्यांवर स्पष्टपणे आपली मतं मांडत आहे. लोकांना तिची बिनधास्त मतं आवडत आहेत.