आघाडीच्या Bollywood अभिनेत्रीचं स्वयंवर; विजय देवरकोंडा, कार्तिक आर्यनचाही सहभाग?

तिनं आपलंही स्वयंवर व्हावं अशी इच्छा व्यक्त करत... 

Updated: Aug 17, 2022, 08:43 AM IST
आघाडीच्या Bollywood अभिनेत्रीचं स्वयंवर; विजय देवरकोंडा, कार्तिक आर्यनचाही सहभाग?  title=
Bollywood Actress Kriti Sanon Swayamvar kartik aryan vijay devarkonda participants

मुंबई : कलाकारांचं स्वयंवर ही काही नवी बाब राहिलेली नाही. हो, पण जेव्हा एखाद्या अनपेक्षित कलाकाराकडून स्वयंवराविषयीची बाब समोर येते तेव्हा मात्र चाहत्यांना धक्का बसतो. सध्या स्वयंवर करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अशाच एका अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे जिनं सर्वांनाच हैराण केलं. 

ही अभिनेत्री आहे, क्रिती सेनन (Kriti Sanon ). तिनं आपलंही स्वयंवर व्हावं अशी इच्छा व्यक्त करत त्यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि विजय देवरकोंडा (kartik aryan vijay deverkonda) यांनी सहभाही व्हावं असंही म्हटलं. आदित्य रॉय कपूर याचंही नाव ती विसरली नाही. 

एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान, क्रिती म्हणाली 'विजय देवरकोंडा देखणा आहे. मला तो समजुतदारही वाटतो. त्याच्या कीह मुलाखती मी पाहिल्या आहेत. तो वास्तववादीही आहे, त्यामुळं तो स्वयंवरात सहभागी होऊ शकतो. कार्तिक आणि आदित्य रॉट कपूरही यात सहभागी होऊ शकतो. आणखी कोणी आहे का जे सिंगल आहेत?' (Bollywood Actress Kriti Sanon Swayamvar kartik aryan vijay devarkonda participants)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kriti (@kritisanon)

'हिरोपंती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या क्रितीनं काही चौकटीबाहेरच्या चित्रपटांना प्राधान्य देत तिचं अभिनय कौशल्य सर्वांनाच दाखवून दिलं. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंगचं पदवी शिक्षण घेणारी क्रिती अभिनय क्षेत्रातही चांगलीच प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे. येत्या काळात ती 'भेदिया', 'गणपथ', 'आदिपुरुष' आणि 'शहजादा' या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x