अरेरे... काय हे...; अंकिता-क्रिती एकमेकिंना धडकल्या आणि...

लग्न झाल्यापासून अंकिता जितक्या वेळा प्रेक्षकांसमोर आली, तेव्हा तेव्हा पती विकी जैन याची तिला साथ होती. 

Updated: Mar 10, 2022, 11:27 AM IST
अरेरे... काय हे...; अंकिता-क्रिती एकमेकिंना धडकल्या आणि...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे हल्ली सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. मुख्य म्हणजे लग्न झाल्यापासून अंकिता जितक्या वेळा प्रेक्षकांसमोर आली, तेव्हा तेव्हा पती विकी जैन याची तिला साथ होती. 

अंकिता ही कायमच तिच्या मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखली जाते. इतकंच काय, तर इतर कलाकार मित्रांशी असणारं नातं जपण्यासाठीही ती ओळखली जाते. 

अशी ही अभिनेत्री नुकतीच क्रिती सेनन हिला धडकली, सोशल मीडियावर या क्षणांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला. यामध्ये अंकिता आणि क्रितीची ही भेट नेमकी कशी होती यावरून पडदा उठला. 

मुंबईतील फिल्मसिटी येथून अंकिता बाहेर पडत असतानाच तिथं क्रिती एका कार्यक्रमासाठी घाईगडबडीनं निघाली होती. यावेळी अंकितानं क्रितीला हाक मारली. 

आता बहुतांश नेटकऱ्यांचं असं म्हणणं, की क्रितीचं अंकिताकडे लक्षी नव्हतं, तरीही तिनं तिला हाक मारली. किंबहुना अंकिताच्या पतीलाही तिनं पाहिलं नाही, तरीही त्यानं क्रितीला हाक मारत तिला हात मिळवला. 

पाहणाऱ्यांना ही बाब कमालीची खटकली. काहींनी मात्र इथंही अंकिताच्या स्वभावाटं कौतुक करत तिला दाद दिली. 

एकिकडे सुशांत सिंह राजपूत याची पूर्वाश्रमीची प्रेयसी आणि दुसरीकडे त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणारी अंकिता पाहता आता तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नेमकं काय वाटतं, ते व्हिडीओ पाहून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.