कोट्यवधींची मालकीण असणाऱ्या Kareena Kapoor चं घर आतून कसं दिसतं पाहाचयंच? photo viral

करीना कपूरच्या घराची एक झलक पाहण्यासाठी चाहते (Kareena Kapoor House) आतुर झाले असतात. 

Updated: Oct 8, 2022, 02:43 PM IST
कोट्यवधींची मालकीण असणाऱ्या Kareena Kapoor चं घर आतून कसं दिसतं पाहाचयंच? photo viral  title=

Kareena Kapoor Inside House Photo Viral: करीना कपूर सध्या आपल्या नव्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त झालेली पाहायला मिळते आहे. लाल सिंग चड्ढाच्या अपयशानंतर करीना फारशी प्रकाशझोतात दिसत नव्हती आता पुन्हा एकदा करीनानं आपल्या नव्या चित्रपटांसाठी कंबर कसलेली दिसते आहे (Kareena Kapoor in Laal Singh Chaddha). तिनं नुकताच लंडन दौरा केला होता. काही दिवसांपुर्वीही ती लंडनमध्ये असल्याचं बोललं गेलं होतं. आता करीनाचा नवा व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर (Kareena Kapoor Video) पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये करीना आपल्या घरात बसून नव्या स्टाईलिश चपला खरेदी करताना दिसते आहे. (bollywood actress kareena kapoor shares her inside house photos on instagram netizens reacts)

करीना कपूरच्या घराची एक झलक पाहण्यासाठी चाहते (Kareena Kapoor House) आतुर झाले असतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच आपलंही घर असंच असावं. या व्हिडीओतून करीनाच्या घराच्या बाल्कनीचा काही भाग तुम्हाला दिसेल. या ठिकाणी योगा करताना करीना अनेकदा दिसते आणि आपले (Kareena Kapoor Yoga) हे व्हिडीओजही ती इन्टाग्रामवर टाकत असते. या व्हिडीओत करीना कपूर आपल्या लायब्ररीत दिसते आहे, आणि खाली बसून ती नवे शूज खरेदी करते आहे. (Kareena Kapoor Instagram Videos) '

आणखी वाचा  - 'हर हर महादेव' चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय

करीना कपूर ज्या लायब्ररीत बसली आहे ती सैफ अली खानचीही खास जागा आहे कारण अनेकदा सैफ अली खान येथे पुस्तक वाचायला बसतो. त्याचे असेच दोन फोटो करीनानं पोस्ट केले होते ज्यावरून कळून येते की सैफची ही एक खास जागा आहे. (Saif Ali Khan House) 

करीना या व्हिडीओत ऑलिव्ह रंगाच्या सोफ्यावर बसली आहे. पलंगाच्या एका बाजूला चहाचं टेबल आहे दुसऱ्या बाजूला एक लाकडी कॅबिनेट आहे आणि वर मेणबत्ती होल्डर दिसतो आहे जे फार एक्सपेन्सिव्ह आहे. त्याचसोबत त्या कॅबिनेटच्या बाजूला एक महागडी गिटारही आहे. तर सोफ्याच्या भिंतीवर एक सुंदर पेंटिग आहे. 

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करीना कपूर लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. सुजॉय घोषचा हा प्रोजेक्ट नेटफ्लिक्सवर (Kareena Kapoor ott debut)प्रदर्शित होणार आहे. सध्या करीना हंसल मेहताच्या मर्डर मिस्ट्रीचं शूटिंग करत आहे. (Kareena Kapoor in Hansal Mehta's Murder Mistry)