सैफच्या पहिल्या पत्नीच्या मुलांबद्दल करिना 'असा' विचार करते? पाहून तुमचेही डोळे चमकतील

अखेर ही बाब समोर 

Updated: Aug 5, 2022, 10:29 AM IST
सैफच्या पहिल्या पत्नीच्या मुलांबद्दल करिना 'असा' विचार करते? पाहून तुमचेही डोळे चमकतील  title=
Bollywood Actress kareena kapoor khan saif ali khans kids from first wife amrita

मुंबई : बॉलिवूडमध्ये नात्यांची समीकरणं जरा जास्तच वेगळी आहेत. कुठे काही नाती बहरतात, तर कुठे वर्षानुवर्षे टिकणारी नातीही तुटतात. नात्यांची ही गुंतागुंत अनेकांसाठी अनाकलनीय. पण, मुद्दा असा की सेलिब्रिटी मंडळी मात्र त्यांच्या आयुष्यातील या सर्व नात्यांना अतिशय शिताफीनं हाताळतात. (Bollywood Actress kareena kapoor khan saif ali khans kids from first wife amrita)

अभिनेत्री करीना कपूर खाननं हल्लीच 'कॉफी विथ करण' या टॉक शोमध्ये यासंदर्भातील वक्तव्य केलं. सैफ अली खान याच्याशी करीनानं लग्नगाठ बांधण्यापूर्वीही बऱ्याच वर्षांआधी तो विवाहित होता. 

अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत त्यानं लग्न केलं. या नात्यातून सैफला सारा आणि इब्राहिम ही दोन मुलंही झाली. काही कारणास्तव त्याच्या आणि अमृताच्या वैवाहिक नात्यात दुरावा आला. पण, तरीही सैफचं मुलांशी असणारं नातं बदललं नाही. 

आज जेव्हा करीनाला यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पतीच्या पहिल्या पत्नीच्या मुलांसोबतचं नातं कसं असेल याचा मी कधीच विचार केला नाही, इतक्या स्पष्ट शब्दांत तिनं आपलं मत मांडलं. माझ्या मनातही कधी सारा आणि इब्राहिमशी कसं वागायचं याचा विचार आला नाही. ती सैफची मुलं आहेत आणि अर्थात त्यानं त्यांना प्राधान्यस्थानी ठेवायलाच हवं, असं तिनं करणशी बोलताना स्पष्ट केलं. 

आम्ही एक कुटुंब आहोत असं सांगताना यावेळी करीनानं 'कभी खुशी कभी गम'मधील आपण साकारलेल्या भूमिकेवर साराचं जीवापाड प्रेम असल्याचंही सांगितलं. इब्राहिमशी तिच्या होणाऱ्या गप्पांचा खुलासाही या कार्यक्रमादरम्यान झाला.

काही नात्यांना उगाचच ताणून ती तोडण्याच्या मार्गावर आणण्यापेक्षा नाती जपण्याकडेच भर असावा असंच करीनाच्या बोलण्यातून जाणवलं. कितीही काहीही असो, सरतेशेवटी तुमच्यासाठी कुटुंबतच सर्वकाही असतं असं म्हणत करीनानं तिच्यालेखी असणारं कुटुंबाचं महत्त्वं सर्वांसमोर सोप्या शब्दांत मांडलं. 

करणशी गप्पा मारण्यासाठी ती यावेळी अभिनेता आमिर खान याच्यासोबत उपस्थित राहिली होती. आगामी 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.