Chhapaak trailer : ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या कंगनाच्या बहिणीकडून दीपिकाची प्रशंसा

कंगनाच्या बहिणीलाही या वेदनांचा सामना करावा लागला होता

Updated: Dec 11, 2019, 03:16 PM IST
Chhapaak trailer : ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या कंगनाच्या बहिणीकडून दीपिकाची प्रशंसा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री Deepika Padukone दीपिका पदुकोण हिच्या बहुतांश भूमिका या चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतात. सध्याच्या घडीला बी- टाऊनची ही आघाडीची अभिनेत्री अशाच एका भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. त्याच भूमिकेची एक झलकही प्रेक्षकांना पाहता आली. दीपिकाचा हा आगामी चित्रपट म्हणजे 'छपाक' Chhapaak. 

ऍसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनातील काही प्रसंगांवर प्रकाशझोत टाकत हा चित्रपट साकारण्यात आला आहे. दीपिकाची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'छपाक'मधून अभिनेत्रा विक्रांत मेसी दीपिकासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. नुकताच मेघना गुलजार दिग्दर्शित या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ज्यावर आता सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. 

Chhapaak trailer पाहिल्यानंतर अभिनेत्री कंगना रानौत हिच्या बहिणीनेही तिची प्रतिक्रिया दिली. ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या आणि काही आव्हानांचा सामना केलेल्या रंगोली हिने अतिशय सुरेख शब्दांत दीपिका आणि मेघना गुलजार यांना दाद दिली आहे. 

'कंगनाला जीव जाईपर्यंत मारलेलं, माझ्यावर जवळपास एक लिटर ऍसिड फेकलेलं....'

सर्वांनीच हा ट्रेलर पाहावा, असं म्हणत रंगोलीने स्वत: या ट्रेलरचा व्हिडिओ शेअर केला आहे. तर, आणखी एका ट्विटमध्ये तिने मेघना आणि दीपिका या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांनाच भावूक करणार आहेत, अशा ओळी लिहित आपण आणि आपल्या कुटुंबाने ज्या यातना सहन केल्या आहेत त्या, मरणयातनांपेक्षा जास्त होत्या असं म्हणत आपल्या वेदना शब्दांवाटे व्यक्त केल्या. प्रत्येक ऍसिड हल्ला पिडितेची व्यथा, तिचा संघर्ष हा साऱ्या देशात पोहोचला पाहिजे असं म्हणत तिने एक आशा व्यक्त केली. 

सोशल मीडियावर आपल्या बहिणीच्या म्हणजेच अभिनेत्री कंगना रानौत हिची पाठराखण करण्यासाठी सज्ज असणाऱ्या रंगोलीचा हा अंदाज अनेकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला. या निमित्ताने पुन्हा एकदा तिने ज्या प्रसंगांना तोंड दिलं होतं त्याची आठवणही अनेकांना झाली. जे पाहता काही नेटकऱ्यांनी तिला दिलासाही दिला.