'आपको क्या...?' कुठे फिरते, कोणासोबत काय करते म्हणत प्रश्न विचारणाऱ्यांवर संतापली जान्हवी

तिची कोणा एका व्यक्तीशी असणारी जवळीक, रात्री उशिरापपर्यंतच्या पार्टी, आऊटिंग आणि बरंच काही चर्चेत आलं

Updated: Aug 25, 2022, 11:37 AM IST
'आपको क्या...?' कुठे फिरते, कोणासोबत काय करते म्हणत प्रश्न विचारणाऱ्यांवर संतापली जान्हवी  title=
Bollywood Actress janhavi kapoor slams them who quetioned about her life late night parties and outing

मुंबई : श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांच्या थोरल्या मुलीनं म्हणजेच जान्हवी कपूर (janhavi kapoor ) हिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्री म्हणून दर दिवसागणिक स्वत:ला नव्यानं घडवू पाहणाऱ्या जान्हवीनं फार कमी काळात तिचा चाहतावर्ग निर्माण केला. अनेकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीनं तिच्या मादक रुपानंही सर्वांनाच घायाळ केलं.

मॉडेलिंग असो किंवा मग अभिनय, जान्हवी प्रत्येक क्षेत्रात सराईताप्रमाणए वागू लागली. तिथे ओघाओघानं तिचं खासगी आयुष्यही प्रकाशझोतात आलं. जान्हवीचा मित्रपरिवार, तिची कोणा एका व्यक्तीशी असणारी जवळीक, रात्री उशिरापपर्यंतच्या पार्टी, आऊटिंग आणि बरंच काही चर्चेत आलं. 

किती पार्ट्या करते ही... किती तोकडे कपडे घालते ही.., बापरे जान्हवी जरा जास्तच बोल्ड झालिये ना? असे एक ना अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी आणि नाही म्हटलं तरी कलाजगतातही अप्रत्यक्षरित्या बऱ्याचजणांनी उपस्थित केले. 

वाचा : Ex Girlfriend समोर आणणार Elon Musk चं खरं रुप; प्रायव्हेट Photo ची एकच चर्चा 

सहसा जान्हवीनं आतापर्यंत आपल्याविषयी होणाऱ्या या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण, आता मात्र तिनं एक उपरोधिक व्हिडीओ शेअर केला आहे. खरंतर हे एक रील आहे, जिथं ती 'मै घुमू, फिरु, नाचू, गाऊ, किसिके साथ जाऊ, अकेली जाऊ.... आपको क्या?' म्हणत Attitude दाखवताना दिसत आहे. 

नाही म्हटलं तरी जान्हवीचा हा एक व्हिडीओ तिच्यावर टीका करणाऱ्यांसाठी आणि तिला वारंवार निशाण्यावर घेणाऱ्यांसाठी पुरेसा आहे. तुम्हाला काय वाटतं?