#HappyBirthdayTigerShroff : प्रेयसीकडून टायगर श्रॉफला खास शुभेच्छा

AMAZING...! 

Updated: Mar 2, 2020, 01:36 PM IST
#HappyBirthdayTigerShroff : प्रेयसीकडून टायगर श्रॉफला खास शुभेच्छा title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ Tiger Shroff हा अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. फक्त अभिनयच नव्हे, तर नृत्यक्षेत्रातही तो तितकाच प्रभावी कामगिरी करताना दिसतो. अशा या अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव करण्य़ास सुरुवात केली आहे. चाहते आणि सेलिब्रिटी मित्रमंडळींकडून शुभेच्छा मिळत असतानाच त्याला एका खास व्यक्तीनेही शुभेच्छा दिल्या आहेत. 

खास व्यक्तीच्या तितक्याच खास शुभेच्छा टायगरसाठीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कारण, ही व्यक्ती म्हणजे त्याची तथाकथित प्रेयसी अभिनेत्री दिशा पटनी. दिशाने टायगरच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आणि टायगर 'तेरी मेरी...' या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. यामध्ये दिशा आणि टायगर हे दोघंही एकमेकांच्या साथीने नृत्य सादर करताना दिसत आहेत. 

दिशा आणि टायगरच्या या व्हिडिओमध्ये त्यांची केमिस्ट्रीही दिसत आहे. हा व्हिडिओ जितका खास आहे तितकंच दिशाने टायगरसाठी लिहिलेलं कॅप्शनही खास आहे. ''हा आपला एकत्र नृत्य करतानाच पहिला व्हिडिओ होता. मी तुझ्यासोबत नृत्य करण्यासाठी जरा जास्तच बुझल्यासारखी झाले होते'', असं लिहित त्याने वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा 'बाघ' या शब्दांत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

पाहा : 'येसूबाईं'ना नाही आवरला लाठीकाठी खेळण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासोबतच तिने टायगरला त्याच्या चित्रपटाच्या यशासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. या दोन्ही कलाकारांची केमिस्ट्री पाहता आता ही जोडी टायगरचा वाढदिवस नेमका कसा साजरा करणार, हे पाहणंही औत्सुक्याचं असेल.