....म्हणून दीपिकाने घेतली रणबीरच्या आई- वडिलांची भेट

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या आजारपणाविषयी काही दिवसांपूर्वीच अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली होती.

Updated: May 12, 2019, 02:26 PM IST
....म्हणून दीपिकाने घेतली रणबीरच्या आई- वडिलांची भेट  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या आजारपणाविषयी काही दिवसांपूर्वीच अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली होती. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपण आता कॅन्सरमुक्त असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळताच बॉलिवूडमध्येही अनेकांनीच आनंद व्यक्त केला होता. ज्यानंतर आता ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर यांनी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. 

नीतू कपूर यांनी पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसत आहे. दीपिका सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे, जेथे तिने ऋषी कपूर यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीविषयी चौकशी केली. दीपिकाची ही भेट अर्थातच तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराच्या म्हणजेच रणबीर कपूरच्या आई- वडिलांना आनंद देऊन गेली. 

 
 
 
 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

"Such a fun evening with adorable @deepikapadukone .. gave lot of love n warmth", असं कॅप्शन देत नीतू कपूर यांनी हा फोटो पोस्ट केला. फक्त दीपिकाच नव्हे, तर यापूर्वी अनेक कलाकारांनी ऋषी कपूर यांच्या आयजारपणात त्यांची भेट घेत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार दिला होता. खुद्द रणबीरही त्याच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून आई- वडिलांनाही तितकाच वेळ देत होता. आता अनेकांनाच प्रतिक्षा लागली आहे ती म्हणजे कधी एकदा ऋषी कपूर मायदेशी परणार याची.