रणबीरच्या आईशी असणाऱ्या नात्याविषयी आलिया म्हणते....

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या रणबीर आणि आलियाचं नातं आता सर्वज्ञात आहे.

Updated: Apr 28, 2019, 02:58 PM IST
रणबीरच्या आईशी असणाऱ्या नात्याविषयी आलिया म्हणते....  title=
रणबीर कपूर, आलिया भट्ट, नीतू सिंग

मुंबई : बॉलिवूडमध्ये कलाकार हे त्यांच्या आगामी चित्रपटांशिवाय आणखी एका कारणामुळे चर्चेत असतात. ते कारण म्हणजे कलाकारांचं खासगी आयुष्य. त्यांच्या रिलेशनशिपपासून ते या सेलिब्रिटींच्या आयुष्यातद नेमकं काय घडत आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांच्या मनात अतिशय कुतूहल असतं. गेल्या काही दिवसांपासून असंच कुतूहल पाहायला मिळत आहे, अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या नात्याविषयी. 

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या रणबीर आणि आलियाचं नातं आता सर्वज्ञात आहे. याच नात्यात आता एक सुरपेख वळण आलं आहे. मुख्य म्हणजे माध्यमांपासून कुटुंबीयांपर्यंत सगलीकडेच या नात्याची ग्वाही देण्याला खुदद् रणबीर आणि आलिया प्राधान्य देत आहेत. अशी ही जोडी रणबीरच्या आईच्या म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंग यांनाही फार भावली आहे. 

सोशल मीडियावर अनेकदा रणबीरच्या कुटुंबीयांसोबतचे आलियाचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहता त्यांच्या नात्यात असणारी सहचजता लगेचच लक्षात येत आहे. किंबहुना आलियाचंही या नात्याविषयी असंच काहीसं मत आहे. रणबीरच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीसोबत असणारं नीतू यांचं नातं आणि आलियासोबत असणारं नातं याविषयी तिला प्रश्न विचारण्यात आला. ज्याचं उत्तर आलियाने देत रणबीरच्या आईसोबतचंही तिचं सुरेख नातं सर्वांसमोर ठेवलं. आपल्यातील नेमके कोणते गुण त्यांना भावले की त्या मला पसंत करु लागल्या हे खरंच माहित नाही, असं आलियाने स्पष्ट केले. हा प्रश्न थेट नीतू कपूर यांनाच विचारावा, असंही ती म्हणाली. नीतू कपूर यांच्यासोबत आपण अनेक खासगी विषयांवर गप्पा मारत असून, अनेक विषयांवर चर्चाही करत असल्याचं आलियाने सांगितलं. 

'सावरियाँ' रणबीरच्या आईसोबतचं आलियाचं हे नातं खरंच शब्दांपलीकडचं आहे, असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, कुटुंबीयांची सहमती आणि चाहत्यांचं अमाप प्रेम मिळवणारी ही जोडी त्यांच्या नात्याला आता नवं वळण कधी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x