अभिनेत्री आलिया भट्टच्या प्रेग्नेन्सीवर Rakhi Sawant ची प्रतिक्रिया, म्हणाली...

 बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने नुकतीच प्रेग्नन्सीची घोषणा केली होती.

Updated: Jun 29, 2022, 07:06 PM IST
अभिनेत्री आलिया भट्टच्या प्रेग्नेन्सीवर Rakhi Sawant ची प्रतिक्रिया, म्हणाली... title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने नुकतीच प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सोशल मीडियावर मीम्स आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत होत्य़ा. त्यात आता बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंत प्रेग्नेन्सीवर प्रतिक्रिया दिली आहे.  

सोशल मीडियावर व्हिडिओ आणि विधानाने चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतनेही प्रेग्नेन्सीवर प्रतिक्रिया दिली आहे.  आलियाची प्रेग्नंट असल्याची बातमी ऐकताच राखी म्हणाली, ती लग्नाची वाट पाहू शकत नाही आणि लग्नाआधीच आई होऊ शकते, असे राखीने सांगितले आहे. 

राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राखी फोटोग्राफर्स तिला विचारतात की आलिया प्रेग्नंट आहे. यावर राखी बोलते, “मी कधी आई होणार? माझ्या आयुष्यात सुख कधी येणार. लग्नाआधी आलं तरी हरकत नाही. लग्ना आधीही आनंदाची बातमी येऊ शकते. आनंदाची बातमी आली की लगेच दुसऱ्या दिवशी मी लग्न करेन. आजकाल हे असंच होतं आहे.”

दरम्यान तिच्या या विधानाच काहींनी समर्थन केलं, तर काहींनी तिला ट्रोल देखील केले आहे.