मुंबई : कथानकाच्या आवश्यकतेनुसार अनेकदा वेब सीरिज असो किंवा मग एखादा चित्रपट, त्यामध्ये इंटिमेट सीनचा भरणा पाहायला मिळतो. अशाच एका चित्रपटामधील इंटिमेट दृश्यांनी प्रेक्षकांना हैराण केलं.
कारण, होतं ते म्हणजे त्या दृश्यांमध्ये दिसणारा अभिनेता. एरव्ही चॉकलेट बॉय म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या अभिनेत्यानं एका चित्रपटातूनच त्याची ही प्रतिमा मोडीत काढली.
कायमच काही प्रेमळ भूमिका त्याच्या वाट्याला आल्या. पण, जेव्हा आपल्याच चौकटीतून बाहेर पडायची पाळी आली, तेव्हा मात्र तो असा काही समोर आली, की पाहणाऱ्यांचाही यावर विश्वास बसेना. हा अभिनेता म्हणजे वरुण धवन.
'बदलापूर' या चित्रपटात वरूण चार अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला. यावेळी दिव्या दत्ता, यामी गौतम, राधिका आपटे आणि हुमा कुरेशी यांच्यासोबत इंटिमेट झाल्याचं पाहायला मिळालं.
वरुण यापैकीच एका दृश्यात काहीसा आवेगात आल्याचं दाखवायचं होतं. ज्या दृश्याच्या चित्रीकरणावेळी तो इतका आक्रमक झाला होता, की अभिनेत्री हुमा कुरेशी टेक संपताच रडू लागली होती.
वरुणची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या कथानकापेक्षा सर्वात जास्त चर्चा या चित्रपटातील त्याच्या वेगळ्या भूमिकेची झाली. चार अभिनेत्रींसोबत वरुणची केमिस्ट्रीही त्यावेळी कमालीची चर्चेत होती.