बॉलिवूडला हादरा; आलिया भट्टच्या 'वडिलांचं' निधन

नव्या आठवड्याची सुरुवातच हादरवणारी झाली आहे. बॉलिवूडमध्ये सध्या अशी परिस्थिती उदभवली आहे.

Updated: Apr 11, 2022, 10:19 AM IST
बॉलिवूडला हादरा; आलिया भट्टच्या 'वडिलांचं' निधन title=
प्रातिनिधिक छायाचित्र

Popular Bollywood actor Shiv Kumar Subramaniam Death: नव्या आठवड्याची सुरुवातच हादरवणारी झाली आहे. बॉलिवूडमध्ये सध्या अशी परिस्थिती उदभवली आहे, जिथं सर्वांनाच एका दिग्गज कलाकाराच्या निधनानं धक्का बसला आहे. लोकप्रिय पटकथा लेखक आणि अभिनेते शिव कुमार सुब्रमण्यम यांनी जगाचा निरोप घेतला आहे. अनेक मालिका. सीरिज आणि चित्रपटांतून सुब्रमण्यम यांच्या अभिनयाची झलक चाहत्यांनी पाहिली. 

चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्विट करत सुब्रमण्यम यांच्या निधनाची माहिती दिली. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाचंही निधन झालं होतं. लेकाच्या निधनानं खचलेल्या शिव कुमार आता कुठे या आघातातून सावरत होते तोच नियतीनं त्यांच्यावर घाला घातला. 

शिव कुमार सुब्रमण्यम यांनी अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय आणि तितक्या धीरगंभीर भूमिका बजावल्या. 'टू स्टेट्स' या चित्रपटामध्ये त्यांनी आलिया भट्टच्या (Alia Bhatt) वडिलांची भूमिका साकारली होती. अतिशय शिस्तप्रिय आणि तितक्याच गंभीर व्यक्तमत्त्वाला त्यांनी चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं होतं. 

आलिया आणि सुब्रमण्यम यांची वडिल -मुलीची केमिस्ट्रीसुद्धा या चित्रपटामुळं सर्वांचं मन जिंकून गेली. तिथं आलिया लग्नाच्या घाईगडबडीत असतानाच इथं तिच्या वडिलांच्या भूमिकेत दिसलेल्या कलाकारानं जगाचा निरोप घेणं तिच्यासाठीही धक्काच असल्याचं म्हटलं जात आहे.