दिवसभरात 30 कप ब्लॅक कॉफी आणि... शाहरुखची ही सवय कळल्यावर तुमचीही त्याच्याबद्दलची मतं बदलतील

किंग खानची प्रत्येक गोष्ट चाहत्यांना आवडते. पण, त्याच्या काही सवयी मात्र अनेकांनाच खटकतात. 

Updated: May 7, 2022, 01:50 PM IST
दिवसभरात 30 कप ब्लॅक कॉफी आणि...   शाहरुखची ही सवय कळल्यावर तुमचीही त्याच्याबद्दलची मतं बदलतील title=
shah rukh khan

मुंबई : Shahrukh Khan Lifestyle: भारतीय चित्रपट जगतामध्ये अभिनेता शाहरुख खान याच्या नावाला वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून रुपेरी पडदा गाजवणाऱ्या या अभिनेत्यानं त्याच्या कलेच्या बळावर आणि जिद्दीवर प्रचंड लोकप्रियता, श्रीमंती, चाहत्यांचं प्रेम आणि कुटुंबीयांचा आधार मिळवला. 

कोट्यवधींच्या मनावर राज्य करणारा शाहरुख जसं आयुष्य जगतो हे पाहता तुम्हीही तोंडात बोटं टाकाल असंच म्हणावं लागेल. कारण, शाहरुखचं आयुष्यच अगदी तसं आहे. 

किंग खानची प्रत्येक गोष्ट चाहत्यांना आवडते. पण, त्याच्या काही सवयी मात्र अनेकांनाच खटकतात. किंबहुना त्याच्याबद्दल अशी माहिती वाचून तुमची त्याच्याबद्दल असणारी मतंही बदलू शकतात. 

एका मुलाखतीत शाहरुखनं त्याच्या एका वाईट सवयीची माहिती सर्वांना सांगितली. मला दिवसभरात जवळपास 100 सिगरेट आणि 30 एक ब्लॅक कॉफी पिण्याची सवय आहे, असं तो म्हणाला होता. 

100 सिगरेट दिवसाला म्हणजे उरलेलं गणित केलं असता यातून  समोर येणारा आकडा धडकीच भरवणारा आहे. किंग खानची ही सवय पाहता, हे वागणं बरं न्हवं... असंच चाहते म्हणत आहेत. 

शाहरुखची ही मुलाखत 2011 मधील आहे, त्यामुळं दरम्यानच्या काळात त्याचं हे प्रमाण कमी झालंय की वाढलंय हे जाणून घेणंही औत्सुक्याचं. 

'मला झोपच येत नाही.... मी जवळपास 100 सिगरेट पितो. जेवणंही विसरतो. मला चित्रीकरणामध्येच आठवतंय की मला जेवायचंपण आहे. मी पाणीही नाही पित, जवळपास 30 कप कॉफी मी पितो. तरीही माधे सिक्सपॅक अॅब्स आहेत', असं म्हणत मी स्वत:ची जितकी कमी काळजी घेतो तितकीच जास्त काळजी आपोआपच घेतली जाते, असंही तो म्हणाला. 

शाहरुखच्या या सवयी नक्कीच चांगल्या नाहीत, पण आता त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी हा अभिनेता काही पावलं उचलतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.