मुलासाठी हळहळतोय शाहरुख; त्याला ‘या’ गोष्टीची भीती होतीच...

मला भीती आहे की.... 

Updated: Oct 25, 2021, 02:29 PM IST
मुलासाठी हळहळतोय शाहरुख; त्याला ‘या’ गोष्टीची भीती होतीच...  title=
शाहरुख खान आणि त्याचं कुटुंब

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज केस प्रकरणी एनसीबीनं ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याच्या कोठडीचा एक- एक दिवस वाढतच गेला. आर्यन खानची सुटका होत नसल्यामुळं किंग, शाहरुख खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबातच चिंतेचं वातावरण आहे. यातही शाहरुख काही प्रसंगी त्याच्या कामावरही लक्ष केंद्रीत करत आहे. पण, यावरुनही त्याची खिल्ली उडवली जात आहे.

शाहरुख आणि त्याचं कुटुंब ट्रोलर्सच्या निशाण्यावर असताना आणि प्रचंड तणावाखाली असतानाच आता एक अशी बाब समोर आली आहे, ज्यामुळं सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. स्वत:च्या कुटुंबासोबतच शाहरुख त्याच्या चाहत्यांच्या वर्गालाही तितकंच महत्त्वं देतो. एका सर्वसामान्य पालकाच्या भूमिका जाणणारा हाच किंग खान, सध्या आपल्या पाल्याविषयीही चिंतेत दिसत आहे.

एका मुलाखतीत करण्यात आलेल्या उलगड्यानुसार शाहरुखनं काही मुद्दे स्पष्ट केले होते. आपल्याला मिळालेली प्रसिद्धी आणि नावाची किंमत आपल्या मुलांना फेडावी लागू शकते हे सत्य त्यानं मुलाखतीत बोलून दाखवलं होतं. ‘मुलांनी मला एक वडील म्हणून ओळखलं पाहिजे. शाहरुख खान, या नावानं नव्हे. भांडण करुन त्यानंतर, अरे मी तर माझ्या वडिलांपेक्षाही वरचढ आहे असं त्यांनी म्हणू नये. कुटुंब आणि मुलांबाबत मला भीतीच वाटते. त्यांनी माझ्या सावलपासून दूर रहावं असं मला वाटतं. त्यांनी केव्हाही भांडू नये. ती माझी मुलं आहेत यासाठी त्यांना काहीच करण्याची गरज नाही, या अविर्भावात त्यांनी कधीही राहू नये’, असं तो म्हणाला होता.

आपल्या मुलांनी केव्हाही या प्रसिद्धीखाली दबून न जाता, त्यांना योग्य वाटेल त्या वाटेवर  जाऊन नाव कमवावं याचसाठी शाहरुख आग्रही होता. पण, सध्या मात्र परिस्थिती त्याच्यावरच रुसल्याचं दिसून येत आहे.