एका भीतीपोटी राजबिंडा सलमान आजही अविवाहित; 'या' कारणाचा तुम्ही विचारही केला नसेल

तुमच्याआमच्यापैकी अनेकांनीच सलमानप्रमाणं निर्णय घेतला असावा 

Updated: Dec 27, 2021, 05:29 PM IST
एका भीतीपोटी राजबिंडा सलमान आजही अविवाहित; 'या' कारणाचा तुम्ही विचारही केला नसेल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडमध्ये मागच्या काही काळापासून बऱ्याच बॅचलर अभिनेत्यांनी लग्नगाठ बांधत खासगी आयुष्याचा एक टप्पा ओलांडला आहे. पण, या साऱ्यामध्ये अभिनेता सलमान खान मात्र अविवाहितच असल्याचं पाहायला मिळत आहे. 

बरेच अभिनेते त्यांच्या जीवनाची नवी सुरुवात करत असताना सलमान मात्र त्याचं बॅचलरहूड एंजॉय करताना दिसत आहे. (Salman khan)

आता सलमान अविवाहित का, या प्रश्नाची अनेक उत्तरं अनेक परिंनी देण्यात आली. पण, खरं कारण समोर आलं तेव्हा अनेकांनाच ते पटलं. 

पण, मग सलमानच्या प्रेमापोटी त्यावरही चाहत्यांनी काही उपाय सुचवले. 

सलमानच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असणाऱ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा अभिनेता कुटुंबाच्या अतिशय जवळचा आहे. 

बऱ्याचदा असंही झालं की, कोणा एका व्यक्तीशी सलमानचे सूर जुळले पण, अगदी टोकाशी आल्यावर या नात्यांत मीठाचा खडा पडला. 

प्रत्येक वेळी सलमान त्याच्या कुटुंबाला जितकं प्राधान्य देतो तितकं तो 'खास' व्यक्तीला देऊ शकला नाही. 

कोणा एका व्यक्तीसाठी ही बाब अत्यंत चुकीची असेल, की त्या व्यक्तीसोबत एका नात्यात असतानाही आपण त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. 

दोनदा असंच घडलं, की सलमान लग्नच करणार होता. पण, कुटुंबाप्रती आपलं प्रेम आणि ओढ आपल्या जोडीदाराला कळणार नाही या भीतीपोटी त्यानं माघार घेतली. 

सलमानच्या कुटुंबीयांकडूनही माहिती मिळाल्यानुसार त्याच्या लग्नाचा विषय आता फार कमीच काढण्यात येतो. 

तो इतका काम करतोय की त्याच्याकडे या लग्नासाठी वगैरे काही वेळ नाही, पण सरतेशेवटी स्वत:च्या आयुष्याचा निर्णय तो स्वत:च घेणार आहे.

आता सलमानच्या लग्नाचा मुद्दा येत्या काही वर्षांमध्ये मागेही पडेल. पण, त्याच्या मनातली भीती दूर होऊन तो जेव्हा लग्न करेल तो चाहत्यांसाठी मोठा दिवस असेल यात शंका नाही.