Salman Khan: सलमान खानचा दाक्षिणात्त्य चित्रपट गॉडफादर लवतकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या तो आपल्या या चित्रपटाच्या निमित्तानं विशेष चर्चेत आहे. परंतु सध्या सलमान खान वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आला आहे. (bollywood actor salman khan says everybody goes to hollywood but i go for south indian flims)
देशातील चित्रपटसृष्टीने एकमेकांना सहकार्य करावे, असा सल्ला देतानाच लोकांना हॉलिवूडमध्ये जायचे आहे, असे मत बॉलिवूड अभिनेता सलमान खानने शनिवारी व्यक्त केलं. मला दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत काम करायचे आहे. सलमाननं मुंबईत पत्रकारांना सांगितले, भारतीय चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर तीन ते चार हजार कोटी रुपये कमावण्याची क्षमता आहे.
कलाकारांनी चांगल्या संधींसाठी हॉलिवूडमध्ये जाण्याऐवजी विविध भारतीय प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम करायला हवं. जेव्हा आपण एकत्र काम करू लागतो, तेव्हा आपल्या सर्वांचा किती मोठा प्रेक्षक असेल याची कल्पना करा.
अभिनेता चिरंजीवीच्या 'गॉडफादर' या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरच्या रिलीजच्या वेळी सलमान खान पत्रकारांशी बोलत होता. 'गॉडफादर' मध्ये सलमान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
सलमान म्हणाला, चिरंजीवीचे चाहते मला पाहायला येतात तेव्हा चित्रपटातून माझे चाहते त्याचे चाहते होतात आणि त्याचे चाहते माझे चाहते होतात. अशाप्रकारे आपण पुढे जाऊ. 300-400 कोटी रुपयांची चर्चा करतात, जर आपण सगळे एकत्र आलो तर बॉक्स ऑफिसवर 3000-4000 कोटी रुपये कमवू शकतो.
'द गॉडफादर' हा अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन दिग्दर्शित मल्याळम चित्रपट 'लुसिफर' (2019) चा रिमेक आहे. ज्यात मोहनलाल मुख्य भूमिकेत होते.
मोहन राजा दिग्दर्शित 'गॉडफादर' या चित्रपटात नयनतारा आणि सत्यदेव कांचन मुख्य भूमिकेत आहेत. कोनिडेला प्रोडक्शन कंपनी आणि सुपर गुड फिल्म्स निर्मित 'गॉडफादर' 5 ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.