धक्कादायक! शार्पशूटरच्या निशाण्यावर सलमान खान

सलमानच्या मागावर शार्पशूटर पोहोचला मुंबईत...  

Updated: Aug 19, 2020, 09:17 AM IST
धक्कादायक! शार्पशूटरच्या निशाण्यावर सलमान खान  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता salman khan सलमान खान कायमच चर्चेत असतो ते म्हणजे त्याचे आगामी कार्यक्रम आणि काही वक्त्यांमुळं. पण, यावेळी मात्र हा अभिनेता एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेचा विषय ठरत आहे. ही चर्चा आहे एका शार्पशूटच्या रडावर चक्क सलमान खान असल्याची.

सलमानची रेकी करणाऱ्या आणि एसजीएम नगर येथील प्रवीण हत्याकांडातील आरोपी असणाऱ्या शार्प शूटर राहुल (सांगा, बाबा) याला क्राईम ब्रांचनं उत्तराखंडमधून ताब्यात घेतलं आहे. राहुल हा लॉरेन्स बिष्णोई टोळीतील शार्पशूटर आहे. त्यानं गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि संपत नहेराच्या सांगण्यावरुन जानेवारी २०२० मध्ये मुंबईत जाऊन सलमानची रेकी केली होती, अर्थाच त्याच्या अनेक हालचालींवर नजर ठेवली होती. 

सलमानची दिनचर्या नेमकी कशी असते, तो किती वाजता घरातून बाहेर येतो याबाबतची सर्व माहिती त्यानं मिळवली होती. लॉरेन्स बिष्णोईनं सलमानच्या हत्येचा कट रचला होता, ही धक्कादायक बाब यातून समोर आली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये राहुलनं पोलिसांना चकवत त्यांच्या ताब्यातून गुन्हेगार नरेश सेठीला पळवलं होतं. पुढं त्यानं इतरही साथीदाराना पोलिसांच्या ताब्यातून बाहेर काढलं होतं. 

 

दरम्यान, सलमानच्या भेवती असणारं सुरक्षा कवच पाहता सुदैवानं काही गोष्टी टळल्या. पण, राहुलनं पोलिसांना दिलेल्या माहितीत काही धक्कादायक खुलासेही समोर आले आहेत. ही माहिती आता भाईजानपर्यंत पोहोचल्यावर त्याची यावर काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.