मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाःकार माजवला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रूग्णांची संख्या कमी झालेली दिसून आली. परंतु आता कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोना रूग्णांची संख्या वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेपासुन अनेक बड्या व्यक्तींना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली. गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या कोरोनाने आतापर्यंत अनेकांचे प्राण घेतले आहेत. तर अनेक रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहे.
आता बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने कोरोना झाल्याची माहिती दिली. तो ट्विट करत म्हणाला की, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. कोरोनाचे सैम्य लक्षणं आहे. मी सध्या क्वारंटाइन आहे.' रणवीरच्या या ट्विटनंतर त्याच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
I have tested positive for #COVID1Symptoms are mild. Am quarantining.
— Ranvir Shorey (@RanvirShorey) February 17, 2021
रणवीर सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. शिवाय तो प्रत्येक मुद्द्यांवर आपलं मत मांडू शकतो. काही दिवसांपूर्वी त्याने #IndiaTogether अंतर्गत रिहाना-ग्रेटावर तयार केलेलं एक गाणं सोशल मीडियावर शेअर केलं होतं. 'रियाना तो बहाना है' असं त्याच्या गाण्याचं टायटल होतं.
रणवीर 'वो रंगबाज', 'मेट्रो पार्क', 'बॉम्बर्स हाय' यांसारख्या सीरिज मध्ये झळकला होता. रंगबाजमधील त्याच्या अभिनयाची चांगलीचं चर्चा झाली होती. त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर तो 'मेट्रो 2'मध्ये दिसणार आहे. ही सीरिज Eros nowवर स्ट्रीम होणार आहे.