#DeepikaRanveerWedding : असा पार पडला दीपिका-रणवीरचा साखपुडा

या व्यक्तीने केलं रणवीरचं स्वागत...

Updated: Nov 14, 2018, 07:32 AM IST
#DeepikaRanveerWedding : असा पार पडला दीपिका-रणवीरचा साखपुडा  title=

मुंबई : प्रत्येक क्षणाला होणाऱ्या चर्चा आणि मिळणारी माहिती या साऱ्यामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांचं लग्न खऱ्या अर्थाने ट्रेंडमध्ये आलं आहे. अवघ्या काही क्षणांनीत हे दोघं विवाहबंधनात अडकणार असून, मंगळवारी त्यांचा साखरपुडा पार पडल्याचं कळत आहे. 

'फिल्मफेअर'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दीपिका आणि रणवीर यांचा साखरपुडा हा पारंपरिक कोकणी पद्धतीने पार पडला. फूल मुड्डी असं या पद्धतीचं नाव असून, यामध्ये वधूचे वडील हे नवरदेवाचं आणि त्याच्या कुटुंबीयांचं श्रीफळ देऊन स्वागत करतात. 

रणवीरचं दणक्यात स्वागत केल्यानंतर या सर्वांच्याच लाडक्या जोडीने एकमेकांना अंगठ्या घातल्या. 

उपस्थितांसाठी हा सोहळा कोणा एका स्वप्नापेक्षा कमी नव्हता. मुळात खुद्द 'दीप-वीर'साठीही हे स्वप्नच जणू सत्यात उतरत होतं. 

अद्यापही सोशल मीडियावर दीपिका आणि रणवीरच्या साखरपुडा सोहळ्यातील फोटो पोस्ट करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आता हा सोहळा नेमका कसा होता हे पाहण्याचीच उत्सुकता चाहत्यांमध्ये आणि संपूर्ण कलाविश्वामध्ये पाहायला मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वीच बी- टाऊनची आणि चाहत्यांची ही लाडकी जोडी इटलीमध्ये त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी दाखल झाली. अतिशय मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत दीपिका, रणवीरचा विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नगाठ बांधण्यापूर्वी साखरपुडा, मेहंदी, हळद, संगीत अशा कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं असून, ठरल्याप्रमाणे हे समारंभ सुरेखपणे पार पडत आहेत. 

#DeepikaRanveerWedding