दीपिकाच्या मंगळसूत्राची किंमत ऐकून व्हाल हैराण

सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दीपिका आणि रणवीरने त्यांच्या सहजीवनाच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. 

Updated: Nov 18, 2018, 04:39 PM IST
दीपिकाच्या मंगळसूत्राची किंमत ऐकून व्हाल हैराण  title=

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या विवाहसोहळ्याच्याच चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहेत. सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दीपिका आणि रणवीरने त्यांच्या सहजीवनाच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. 

सध्याच्या घडीला दीपिका- रणवीरच्या लग्नातील लूकपासून त्यांच्या विवाहस्थळापर्यंत प्रत्येक गोष्टीविषयी चाहत्यांमध्ये कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळत असून, आता चर्चा सुरु आहे ते म्हणजे दीपिकाच्या मंगळसूत्राची. 

लग्नसोहळा पार पडल्यानंतरचे दीपिकाचे फोटो आणि तिच्या भांगामध्ये असणारं सुरेख कुंकू या गोष्टींनी सर्वांचीच मनं जिंकल्यानंतर अनेकांचच लक्ष गेलं ते म्हणजे तिच्या मंगळसूत्रावर. 

दीपिकाच्या मंगळसूत्रावर नीट नजर टाकल्यास ही बाब लक्षात येत आहे. सूत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार तिच्या मंगळसूत्रात मौल्यवान असा solitaire जडला असून, तोच याला अधिक खास करत आहे. किंबहुना असंही कळत आहे की, दीपिकाने तिच्या दागिन्यांवर जवळपास एक कोटी रुपये खर्च केले आहेत. 

झालात ना थक्क? दीप-वीरच्या विवाहसोहळ्यात बऱ्याच गोष्टींनी अनेकांच्याच भुवया उंचावल्या. वेगळेपण जपत, चाहत्यांचं प्रेम आणि कुटुंबीयांच्या आशीर्वादाची जोड घेत या दोघांनीही एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे मंगळसूत्रातील त्या मौल्यवान रत्नाप्रमाणेच त्यांच्या भावी आयुष्यातही असेच मौल्यवान क्षण येवोत अशीच इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.