Sunny Leone सोबतचा बोल्ड फोटो शेअर करत अभिनेता लिहितो, '9 पावसाळ्यांपूर्वी...'

सध्याच्या घडीला सनीच्या अशाच एका जुन्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

Updated: Aug 3, 2021, 06:43 PM IST
Sunny Leone सोबतचा बोल्ड फोटो शेअर करत अभिनेता लिहितो, '9 पावसाळ्यांपूर्वी...' title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone ) हिचा मादक अंदाज कायमच अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवतो. सध्याच्या घडीला सनीच्या अशाच एका जुन्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा जुना फोटो शेअर केला आहे तिच्याच एका सहकलाकारानं. 

आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा (randeep hooda). रणदीपनं 'जिस्म 2' या चित्रपटातून सनी लिओनी हिच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातून सनी आणि रणदीपची बोल्ड केमिस्ट्री सर्वत्रच चर्चेचा विषय ठरली. याच चित्रपटाला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सनीसोबतचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. 

सनी आणि रणदीपच्या ऑनस्क्रीन सिझलिंग केमिस्ट्रीनं त्यावेळी बी- टाऊनमध्ये सर्वांच्याच नजरा वळवल्या होत्या. आताही त्याचा हा फोटो काहींच्या काळजाचा ठोका चुकवतोय तर काही बाबतीत अनेक चर्चांना उधाण देत आहे. 

हनी सिंग अडचणीत; घरगुती हिंसाचाराविरोधात पत्नीकडून तक्रार दाखल 

 

सनीचा बोल्ड अंदाज 
रणदीपनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये सनी बिकीनीमध्ये दिसत असून, तिचा बोल्ड अंदाज अनेकांनाच घायाळ करत आहे. मुख्य म्हणजे त्यानं फोटो शेअर करताना लिहिलेलं कॅप्शनही फोटोला साजेसं आहे. '9 पावसाळ्यांपूर्वी...' हे इतकंच लिहित त्यानं हा बोलका फोटो शेअर केला आहे.