Ranbir- Alia Wedding : आलियाच्या मंगळसूत्र- कलिऱ्यांमध्ये दडलाय खास आकडा; तुम्ही पाहिला ?

अतिशय साधेपणानं पण, तितक्याच लक्षवेधी स्वरुपात या सेलिब्रिटी जोडीचा विवाहसोहळा पार पडला.   

Updated: Apr 15, 2022, 12:01 PM IST
Ranbir- Alia Wedding : आलियाच्या मंगळसूत्र- कलिऱ्यांमध्ये दडलाय खास आकडा; तुम्ही पाहिला ?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Ranbir Alia Wedding: शेवटी तो क्षण आलाच जेव्हा अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर या दोघांनीही एकमेकांचा आयुष्यभराचे जोडीदार म्हणून स्वीकार केला. 14 एप्रिल 2022 रोजी आलियानं रणबीरचा पती म्हणून स्वीकार केला. अतिशय साधेपणानं पण, तितक्याच लक्षवेधी स्वरुपात या सेलिब्रिटी जोडीचा विवाहसोहळा पार पडला. 

लग्नाच बऱ्याच गोष्टींमध्ये साधेपणा जपणाऱ्या आलियानं तिच्या मंगळसूत्र आणि हाती असणाऱ्या कलिऱ्यांनी सर्वांच्या नजरा वळवल्या. 

अतिशय सोबर अशा मंगळसूत्राच्या डिझाईनला तिनं पसंती दिली. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये असणारा 8 हा आकडा. 

असं म्हटलं जातं की 8 हा रणबीर कपूरचा भाग्यांक आहे. मंगळसूत्राशिवाय आलियाच्या हाती चुड्यासोबत दिसणाऱ्या कलिऱ्यांमध्येही दिसला. 

मंगलसूत्र में दिखा ये लकी नंबर

आलिया भट्ट का कलीरा

आलियानं पारंपरिकतेला नव्या ट्रेंडची जोड दिल्याचं पाहायला मिळालं होतं. तिच्या हाती असणारे चांदीचे कलिरे नववधू म्हणून तिचा लूक आणखी उठावदार करुन जात होते. 

हाथों में लगवाई मेहंदी और पहना चूड़ा

हेयर स्टाइल का रखा खास ध्यान

सहसा लग्नासोहळ्यांमध्ये मोठ्या मंगळसूत्रांना पसंती दिली जाते, पण आलियानं मात्र अगदी हलक्या आणि तितक्याच नाजूक पण लक्षवेधी डिझाईनची निवड करत नजरा वळवल्या. 

कपूर कुटुंबाच्या या सुनेचं सध्या सर्वच स्तरांतून कोडकौतुक करण्यास सुरुवात झाली आहे. या नववधूविषयी तुमचं काय मत ?