अभिनेत्याला दोन केळी तब्बल ४४३ रूपयांत

अभिनेत्याने याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.

Updated: Jul 25, 2019, 02:29 PM IST
अभिनेत्याला दोन केळी तब्बल ४४३ रूपयांत title=

नवी दिल्ली : बाजारात एका केळ्याची किंमत जास्तीत जास्त ५ रुपये, एक डजन केळ्यांची किंमत ४० रुपये इतकी आहे. मात्र बॉलिवूड अभिनेता राहुल बोसने केवळ २ केळ्यांसाठी तब्बल ४४२ रुपये मोजले आहेत. एका ५ स्टार हॉटेलमध्ये घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ राहुल बोसने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राहुल बोस सध्या चंदिगडमध्ये एका शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शूटिंगसाठी तो शहरातील ५ स्टार हॉटेलमध्ये थांबला आहे. परंतु हॉटेलच्या एका बिलाने राहुलला चांगलाच धक्का बसला आहे. 

ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत राहुलने, 'कोण म्हणतं फळं आपल्यासाठी नुकसानकारक नाही? असा सवालही केला आहे. 

राहुलने हॉटेलमध्ये व्यायामानंतर २ केळी ऑर्डर केली. त्यानंतर रुममध्ये केळ्यांसोबत एक बिलही पाठवण्यात आलं. ज्यात दोन केळ्यांवर जीएसटी लावत ४४२ रुपयांचं बिल देण्यात आलं.

राहुलने हॉटेलमधील या केळ्यांच्या बिलावर नाराजी व्यक्त केली आहे. राहुलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या काही मजेशीर तर काही नाराजी व्यक्त करणाऱ्या कमेंटही येत आहेत. या हॉटेलबाबतही चर्चा सुरु आहे. मात्र, अद्याप हॉटेलकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.