पंकज त्रिपाठीचा मोठा निर्णय, अभिनय क्षेत्रातून बाहेर पडणार?

प्रसिद्धी, पैसा सर्वकाही असताना मात्र पंकज काहीसे चिंतेत टाकणारे विचार करत आहे. 

Updated: Jun 24, 2022, 08:27 AM IST
पंकज त्रिपाठीचा मोठा निर्णय, अभिनय क्षेत्रातून बाहेर पडणार?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दमदार अभिनयाच्या बळावर लोकप्रियता मिळवणारा अभिनेता अशी ओळख सांगितल्यानंतर पुढे आपोआपच समोरून एक नाव उच्चारलं जातं. हे नाव असतं अभिनेता पंकज त्रिपाठी याचं. (Bollywood Actor Pankaj Tripathi reached at saturation point reveals future plans)

अगदी छोटेखानी भूमिकेपासून मध्यवर्ती भूमिकांपर्यंत प्रत्येक कामाला आपलंसं मानत त्यात जीव ओतून ते सादर करण्याची कला या अभिनेत्याला अवगत आहे. 'सेक्रेड गेम्स'मधील स्वामीजी असो किंवा मग त्यानं साकारलेली 'मिर्झापूर'मदील भूमिका असो, प्रत्येक वेळी तो नव्यानं आपल्यासमोर आला. 

साधं राहणीमान, प्रसिद्धी समोर लोळण गालत असतानाही पाय जमिनीवर ठेवून कलाकारापेक्षा कला मोठी या मंत्राचा सातत्त्यानं जप करणारा हा अभिनेता  Sherdil: The Pilibhit Saga या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

अतिशय वेगळ्या कथानकाच्या माध्यमातून तो तितक्याच वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. पण, कारकिर्दीच्या या वळणावर असताना प्रसिद्धी, पैसा सर्वकाही असताना मात्र पंकज काहीसे चिंतेत टाकणारे विचार करत आहे. 

ज्याप्रमाणे तुम्हीआम्ही एकच काम सातत्यानं काही वर्षे केल्यानंतर तोचतोचपणापासून दूर जाऊ इच्छितो, अगदी तशाच भावनेनं त्याच्या मनात  घर केलं आहे. 

सलग मिळणारे चित्रपट, वेब सीरिज आणि सातत्यानं वाढणारा कामाचा व्याप पाहता पंकजच्या मते आता आपण करिअरमध्ये “saturation point”पर्यंत पोहोचलो आहोत. 

येत्या काळातील कामाबद्दल तो काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतो. त्याच्या दृष्टीनं हे निर्णय महत्त्वाचे आणि टाळता न येण्याजोगे असले तरीही चाहत्यांना मात्र चिंतेत टाकणारे आहेत. 

“saturation point”बद्दल काय म्हणाला पंकज ? 
मला ठाऊक आहे, की मी जवळपास आता “saturation point” पर्यंत पोहोचलो आहे. येत्या दिवसांमध्ये मी कमीत कमी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या कामाचीही निवड त्या अनुशंगानं करणार आहे. काही ठरवलं नाही, पण मी आता निवडक कामं स्वीकारणार आहे. 

मी कायम वर्तमानात जगणाऱ्यांपैकी एक आहे. हो पण, आता असं वाटू लागलंय की मी कामाचा व्याप कमी केला पाहिजे. साधारण एक वर्ष किंवा त्याहूनही जास्त काळासाठी मी हा निर्णय घेऊ शकतो. माझा हा निर्णय व्यवस्थित अंमलात आला नाही, तर मी पुन्हा आता जे करतोय तेच करताना दिसेन, असं पंकज त्रिपाठीनं स्पष्ट शब्दांत सांगितलं.