मुंबई : रोजची कामं, धावपळ या साऱ्या चक्राचा एका वळणावर जाणून आपल्या मनावर, मानसिक शांततेवर परिणाम होत असतो. आपल्या वाट्याला येणारं यश आणि अपयशही या साऱ्यामध्ये तितक्याच महत्त्वाच्या भूमिकेत दिसतं. एक व्यक्ती म्हणून काही मुद्दे लक्षात ठेवले तर आपल्यालाही निवांत आयुष्य जगता येऊ शकतं. यासाठी गरज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त विचार बदलण्याची.
विचार बदलणं म्हणजे नेमकं काय करणं? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी.
यश आणि अपयशाची एक वेगळीच परिभाशा समजावून सांगत पंकज त्रिपाठी यांनी एका मुलाखतीत काही मुख्य मुद्दे स्पष्ट केले होते.
त्रिपाठी यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
काय म्हणत आहेत पंकज त्रिपाठी?
मनाची मरगळ आणि नकारात्मत भावना दुर करण्याऱ्या या व्हिडीओमध्ये त्रिपाठी म्हणत आहेत...
'जगणं, हे असंच आहे आणखी काही नाही. कधी दिवस मोठा कधी लहान रात्र. कधीकधी दिवस लहान होईल आणि रात्र मोठी होईल. हे असंच आहे.
कधीच निराश होऊ नका. आता जे तुमच्यासोबत आहे ते पुढे नसेलही. यश असो किंवा अपयश...
हताश होऊ नका कारण तुम्ही अपयशी आहात. आज अपयशी आहात, उद्या यशस्वी असाल. आज यशस्वी आहात उद्या अपयशी असाल.
जैसा आज है, कल नहीं रहेगा…अच्छा या बुरा. pic.twitter.com/ovk1aOmoCe
— Awanish Sharan (@AwanishSharan) December 31, 2021
मी कायमच सांगतो, नदीवर पूल नसेल तर व्यक्तीला पोहता येतं. जेव्हा सुविधा कमी असतात तेव्हा तेच रडगाणं गाऊ नये.
याचा अर्थ असा होतो की तुम्हाला ती परिस्थिती आणखी कणखर करु पाहत असते.'