नवाझच्या नव्या घरी रात्रीच्या वेळी साडी नेसून आली अभिनेत्री; पाहून सगळेच गारद

नवाझनं नवं घेर घेतल्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव आला

Updated: Feb 2, 2022, 12:24 PM IST
नवाझच्या नव्या घरी रात्रीच्या वेळी साडी नेसून आली अभिनेत्री; पाहून सगळेच गारद  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी यानं हल्लीच त्याचं नवं घर सर्वांसमोर आणलं. घराला वडिलांचं नाव देत आणि त्यामध्ये जुन्या घरातील आठवणी जपण्याचा प्रयत्न त्यानं केला आहे. नवाझनं नवं घेर घेतल्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव आला. याच नवीन घरात त्यानं आता एका पार्टीलं आयोजनही केलं होतं. (nawazuddin siddiqui )

नवाझच्या या नव्या घरी असणाऱ्या पार्टीला बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली. यामध्ये अभिनेत्रींची नावं ऐकून आणि त्यांचे लूक पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

नवाब, या नवाझच्या पांढऱ्या शुभ्र महालवजा घरी अभिनेत्री कंगना राणौत शुभ्र साडीमध्ये पोहोचली होती. यावेळी तिच्यावरच सर्वांच्या नजरा खिळल्या. 

एरव्ही वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगनाची यावेळी तिच्या लूकमुळे चर्चा झाली होती. 

पांढरी शुभ्र साडी, गळ्यात मोत्याच्या तीनपदरी माळेचा सर आणि गडद रंगाची लिपस्टीक असा तिचा लूक होता. 

अभिनेत्री अवनीत कौर हिसुद्धा यावेळी पार्टीसाठी पोहोचली होती. यावेळी तिनं काळ्या रंगाच्या आऊटफिटला पसंती दिली होती. 

जवळपास तीन वर्षे नवाझनं त्याच्या या घराच्या आखणी आणि सजावटीसाठी वेळ दिला. आपल्या गावातील जुन्या घराचं प्रतिबिंब या घरात दिसावं यासाठी त्यानं फार मेहनतही घेतली. 

इतकी वर्षे बॉलिवूडमध्ये लखलखणारी कारकिर्द सांभाळत आणि संघर्षाचाही सामना करत त्यानं हे घराचं स्वप्न साकार केलं.