....पण ते निरपराध होते का?; 'बाटला हाऊस'चा पेचात पाडणारा टीझर

नेमकं काय झालं होतं बाटला हाऊसमध्ये? 

Updated: Jul 8, 2019, 02:20 PM IST
....पण ते निरपराध होते का?; 'बाटला हाऊस'चा पेचात पाडणारा टीझर  title=

मुंबई : अभिनेता जॉन अब्राहम याची मुख्य भूमिका असणारा 'बाटला हाऊस' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ताही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला. ज्यामागोमाग आता या चित्रपटाचा आणखी एक म्हणजेच दुसरा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

पहिल्या टीझरमधून ज्या प्रकारे बाटला हाऊसमध्ये नेमकं काय घडलं होतं, असा प्रश्न उपस्थित झाला होता; त्याचप्रमाणे चित्रपटाच्या दुसऱ्या टीझरमधूनही असेच काही प्रश्न उपस्थित होत आहेत. हे प्रश्न पडत आहेत ते म्हणजे पोलीस अधिकारी सुधीर कुमार यादव यांच्या भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेता जॉन अब्राहमला. 

जवळपास दहा वर्षांपूर्वी दिल्लीतील जामियाँ नगर येथे इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाई करण्यात आली होती. या कारवाईलाच 'बाटला हाऊस' असं नावही देण्यात आलं होतं. त्याच घटनेचा आधार घेत जॉनच्या या चित्रपटाचं कथानक साकारण्यात आलं आहे. 

निखिल अडवाणी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, क्रिशन कुमार आणि जॉन अब्राहम याने केली आहे. तर, अभिनेत्री मृणाल ठाकूर हीसुद्धा या चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जॉन पुन्हा एकदा रुबाबदार अधिकाऱ्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे चाहत्यांसाठी ही परवणीच असेल. १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.