Harshvardhan Rane on Sanjeeda Shaikh: बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) सध्या अफेअरमुळे चर्चेत आहे. संजीदा शेखसह (Sanjeeda Shaikh) त्याचं अफेअर सुरु असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. दरम्यान हर्षवर्धन राणेने यावर प्रतिक्रिया देताना "कोण काय विचार करतं, याने मला फरक पडत नाही", असं म्हटलं आहे. 'सनम तेरी कसम' आणि 'हसीना दिलरुबा' सारख्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत दिसलेल्या हर्षवर्धन राणेचं नाव अभिनेत्री संजीदा शेखशी जोडलं जात आहे. दरम्यान हर्षवर्धन राणेने यावर प्रतिक्रिया देताना "कोण काय विचार करतं, याने मला फरक पडत नाही", असं म्हटलं आहे.
हर्षवर्धन राणे आणि संजीदा शेख यांनी आपापल्या इंस्टाग्राम अकाऊंटला फिरायला गेल्यानंतरचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंनंतरच अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याचं कारण हर्षवर्धन राणे आणि संजीदा शेख यांनी आपापल्या इंस्टाग्रामवर वेगवेगळे फोटो शेअर केले असले, तरी त्यांची जीप एकच होती हे काही चाहत्यांनी हेरलं आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलं. पण या चर्चांना हर्षवर्धन किंवा संजीदा यांच्यापैकी कोणीही दुजोरा दिलेला नाही. पण नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत हर्षवर्धन राणेने या चर्चांवर मौन सोडलं आहे.
'न्यूज 18'ला दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धन राणेने संजीदा शेखसह अफेअर सुरु असल्याच्या चर्चांना उत्तर दिलं आहे. "या गोष्टी आता मला त्रास देत नाहीत. याचं कारण लिहिणं पत्रकारांचं काम आहे. त्यांच्याकडे आठवड्याची डेडलाइन असते आणि प्रत्येक दिवसाचा कोटाही असतो. तसंच बातम्या दाखल करण्याचा एक टार्गेटही असतो. मी त्यांच्याकडे फक्त एक माणूस म्हणून पाहतो, जे आपलं काम करण्याचा प्रयत्न करत असतात. ज्याप्रकारे चित्रपटांमध्ये अभिनय करणं माझं काम आहे," असं उत्तर हर्षवर्धन राणेने दिलं आहे.
पुढे त्याने सांगितलं की, "गुगलनुसार माझी उंची 5 फूट 9 इंच इतकी आहे. पण माझी उंची 6 फूट आहे. पण मी कधीही अशा गोष्टींवर स्पष्टीकरण देत बसत नाही".
हर्षवर्धन राणेच्या प्रेमप्रकरणांबद्दल बोलायचं गेल्यास, 2019 मध्ये 'मोहबत्ते' फेम किम शर्माशी त्याचा ब्रेकअप झाला होता. दोघ फार काळ संबंधात होते. पण काही काळ डेटिंग केल्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. तर संजीदा शेखचा घटस्फोट झाला आहे. अभिनेता आमीर अली आणि संजीदा बरीच वर्षं एकमेकाला डेट करत होते. 2012 त्यांनी लग्न केलं होतं. पण 10 वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. 2022 मध्ये आमीर अली आणि संजीदा शेख यांनी घटस्फोट घेतला. दोघांना एक मुलगीदेखील आहे.