...त्यांनी काही बरंवाईट केलं तर; कंगनाला अभिनेत्याचा थेट सवाल

आता त्याच्या या प्रश्नाला क्वीन काय उत्तर देणार?   

Updated: Jul 23, 2020, 08:51 AM IST
...त्यांनी काही बरंवाईट केलं तर; कंगनाला अभिनेत्याचा थेट सवाल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर कलाविश्वात घराणेशाहीच्या वादानं डोकं वर काढलं. अनेक कलाकारांनी या वादात उडी घेतली. फक्त कलाकारच नव्हे, तर निर्माते- दिग्दर्शकांनीही या वादात आपल्या ठाम भूमिका मांडल्या. या वादात kangana ranaut कंगना राणौत ही तिच्या वक्तव्यांमुळं चर्चेचा विषय ठरली. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये कंगनानं तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर या अभिनेत्रींना थेट बी- ग्रेड अभिनेत्री म्हणत त्यांच्यावर टीका केल्याचं पाहायला मिळालं. 

कंगनाच्या सातत्यानं अशा प्रकारच्या वक्तव्यांवर आता काही सेलिब्रिटी स्पष्टपणे व्यक्त होऊ लागले आहेत. याचबाबत अभिनेता तगुलशन देवैया यानंही ट्विट करत तिच्यासमोर एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. कंगना तू सध्या ज्यांची बदनामी करत आहेस, त्यांनी पुढं जाऊन काही बरंवाईट करण्याचं पाऊल उचललं तर तुझी प्रतिक्रिया काय असेल; असा सवाल त्यानं तिच्यापुढे मांडला. 

गुलशननं ट्विट करत लिहिलं, 'मी या कलाविश्वात Outsider ही नाही आणि Insider ही नाही. मी जो आहे, त्यातच आनंदी आहे. मला फक्त माझ्याच जीवनाशी घेणंदेणं आहे. मी कोणावही अवलंबून राहत नाही. मला हवं त्याच पद्धतीनं आयुष्य जगायला आवडतं. माझ्या वतीनं कोणी लढावं अशी माझी मुळीच इच्छा नाही आणि हो मी A ++++ श्रेणीचा कलाकार आहे. कारण, सर्वसाधारण राहून मनोरंजन करताच येत नाही. त्यामुळं लोकं काहीसा रंजक मार्ग अवलंबतात'. 

 

आपले हे विचार मांडल्यानंतर त्यानं थेट कंगनाला उद्देशून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. यामध्ये त्यानं तिच्या नावाचा उल्लेख टाळला. पण, त्याचा रोख मात्र तिच्याकडेच असल्याचं कळलं. तुला हे सारं करुन जिंकल्यासारखं वाटेल? या साऱ्यतून तुला काय मिळणार? असं विचारत त्यानं बॉलिवूडच्या 'क्वीन'लाच जाब विचारला असं म्हणायला हरकत नाही.