किती हा उद्धटपणा! लग्नसभारंभात अभिनेत्याच्या पत्नीचा Attitudeपाहून नेटकरी भडकले, म्हणाले... पाहा Video

परंतु सध्या अभिनेता बॉबी देओल वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आले आहेत.

Updated: Aug 12, 2022, 10:16 PM IST
किती हा उद्धटपणा! लग्नसभारंभात अभिनेत्याच्या पत्नीचा Attitudeपाहून नेटकरी भडकले, म्हणाले... पाहा Video title=

मुंबईः अभिनेता बॉबी देओल आश्रम या वेबसिरिजमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला. वयाची पन्नाशी गाठलेल्या अभिनेता बॉबी देओलने आपल्याला मिळालेल्या यशाबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. आश्रम या वेबसिरिजमुळे अभिनेता बॉबी देओल सोशल मीडियावर चर्चेत होता. परंतु सध्या अभिनेता बॉबी देओल वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आले आहेत.

गुरूवारी अभिनेता बॉबी देओल आपली पत्नी तान्या देओल गायक अर्जुन कानुंगो आणि कार्ला डेनिस यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाले होते. फोटो काढण्याच्या प्रसंगी ते दोघं फोटोग्राफर्सच्या समोर आलेदेखील परंतु पत्नी तान्या देओलचा attitude पाहून मात्र नेटकऱ्यांनी त्या दोघांना ट्रोल केले. फोटोग्राफर्स त्या दोघांचे फोटो काढण्यास उत्सुक होते तेवढ्यात तान्याच्या वागण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बॉबी तान्याला फोटोसाठी पोज देण्यासाठी तिला विनवणी करत होता पण त्याकडे तान्याने दुर्लक्ष केले. याप्रसंगी बॉबीने मात्र स्मितहास्य दिले.

तान्याचा हा attitude पाहून नेटकरी मात्र भलतेच वैतागले. त्यापैंकी अनेकांनी बॉबी देओलची खिल्ली उडवली तर काहींनी त्या दोघांमध्ये भांडण असल्याचा अंदाजही काहींनी वर्तवला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बॉबी नुकताच 'आश्रम 3' मध्ये दिसला. या वेबसिरिजमधून चंदन रॉय संन्याल आणि ईशा गुप्ता यांनी देखील प्रमुख भुमिका केल्या आहेत. या शोचे दोन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत आणि यातील बॉबी यांच्या अभिनयासाठी त्यांच्यावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षावही केला आहे. या मालिकेचे दिग्दर्शन प्रकाश यांनी केले आहे. बॉबी लवकरच 'अ‍ॅनिमल' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.