'प्रसूतीनंतर तुमच्या स्तनांपासून....', अर्जुन रामपालची जो़डीदार म्हणते...

मुलाच्या जन्मानंतर ....

Updated: Aug 14, 2020, 02:31 PM IST
'प्रसूतीनंतर तुमच्या स्तनांपासून....', अर्जुन रामपालची जो़डीदार म्हणते...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कोणाही महिलेसाठी मातृत्त्वाची चाहूल लागण्यापासून बाळाला जन्म देण्यापर्यंतचा काळ हा परीक्षा पाहणारा असतो. मुळात त्यानंरता काळही महिलेची परीक्षा पाहतो. ही परीक्षा असते भावनिक, शारीरिक आणि मानसिक. एक स्त्री जेव्हा प्रसूतकाळातून जात असते तेव्हा तिच्यावर बाळाची आणि अर्थातच स्वत:चीही जबाबदारी असते. याच जबबादारीविषयी आणि होणाऱ्या काही महत्त्वाच्या बदलांविषयी अभिनेता अर्जुन कपूर याची पार्टनर असणाऱ्या गॅब्रिएला डेमेट्रीएड्स हिनं काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.   

एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिनं शरीरात होणाऱ्या बदलांविषयी अगदी मोकळेणानं लिहिलं आहे. मुलाच्या जन्मानंतर गॅब्रिएलानं आपल्या शरीरावरही तितकंच लक्ष दिलं. पण, तिनं नैसर्गिकरित्या शरीरात होणारे बदल मात्र नाकारले नाहीत. त्याचविषयी तिनं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

बाळाला जन्म शरीरात होणाऱ्या बदलांविषयी तिनं लिहिलं, 'तुमच्या स्तनांचा आकार बदलतो... तुमही कंबरही बदलते. पण, तरीही सारंकाही सुरळीत असल्याचं जाणत त्याचा स्वीकार करावा लागतो. शरीरात होणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेशी आपण एकरुप व्हायला हवं. महिला त्यांच्या शरीराच्या पूर्वीच्या बांध्याप्रमाणेच होण्याला प्राधान्य देतात. पण, शरीराचा नवा बांधाही तितकाच सुरे असू शकतो... '. 

 

एक आई म्हणून बाळाची जितकी काळजी घेतली जाते तितकीच काळजी स्वत:ची घेण्यावरही भर दिल्यास ओघाओघानं होणारे हे बदल तितक्याच सकारात्मकपणे स्वीकारणं सोपं जातं, असा सुरेख संदेशच गॅब्रिएलानं तिच्या पोस्टमधून दिला.