लग्न नको, पण मूल हवं; अभिनेत्यानं सांगितलं 'त्या' नात्यामागचं गुपित

अनेक जोड्या आहेत ज्यांनी त्यांच्या या नात्याध्ये लग्नाशिवायच एकत्र राहत सहजीवनाची सुरुवात केली. 

Updated: Feb 15, 2022, 05:47 PM IST
लग्न नको, पण मूल हवं; अभिनेत्यानं सांगितलं 'त्या' नात्यामागचं गुपित  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : एका आनंदी कुटुंबासाठी स्त्री आणि पुरुषानं विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यांच्या सहजीवनाची सुरुवात करावी, अशी नियमवजा समजूत काही वर्षांपूर्वी बरीच पाळली जात होती. समाजात लग्नाला आजही अनन्यसाधारण महत्त्वं आहे. पण, काही जोड्यांनी प्रेमालाच सर्वस्व मानत लग्न आणि तत्सम रुढींना शह देण्याचं काम केलं आहे. (relationship)

आजच्या घडीला अशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी त्यांच्या या नात्याध्ये लग्नाशिवायच एकत्र राहत सहजीवनाची सुरुवात केली. 

अशा जोड्यांमध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची प्रेयसी, मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्स हिचंही नाव आघाडीवर आहे. 

अर्जुन आणि त्याच्या प्रेयसीने लग्न केलं नाही. पण, आज ही जोडी एका मुलाचं पालकत्त्वं निभावत आहे. 

प्रेम हवं, मुलही हवं मग लग्न का केलं नाही, या प्रश्नाचं उत्तर खुद्द अर्जुनने दिलं आहे. 

आपली मनं जोडली गेली असल्यामुळे फार आधीच आपण लग्न केलं असल्याचं त्यानं स्पष्ट केलं. नातं स्वीकारण्यासाठी आपल्याला कागदाच्या तुकड्याची गरज नाही, हेसुद्धा त्यानं स्पष्ट केलं. 

मुळात अर्जुनच नव्हे, तर त्याची प्रेयसी गॅब्रिएलाही लग्नाच्या पक्षात नाही. विवाहसंस्था ही फारच सुरेख गोष्ट आहे, पण हे अतीव महत्त्वाचं मात्र नाही, असं म्हणत तिनं विवाहित जोडप्य़ांशी आपली तुलना केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arjun (@rampal72)

अर्जुन आणि गॅब्रिएला यांनी लग्न केलं नसलं, तरीही ही जोडी एखाद्या वैवाहिक जोडीप्रमाणेच आयुष्य जगताना दिसते. त्यांना एक मुलगाही आहे, ज्याचं वय आता 3 वर्षे आहे. 

समाजातील काही समजुती आणि रुढींना दूर लोटत केवळ प्रेम आणि विश्वासाच्या नात्यावर अर्जुननं एक वेगळं नातंच सगळ्यांसमोर ठेवलं आहे असं म्हणायला हरकत नाही.