मुंबई : रणबीर, रणवीर, शाहीद ही झाली आताच्या काळातील नावं. पण, मागील अनेक दशकांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या कलाकारांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे अभिनेता अक्षय कुमार याचं. सलग सुपरहिट चित्रपट देणारा आणि कमालीचं मानधन घेणारा हा एक बॉलिवूड अभिनेता. (Akshay Kumar)
बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणूनही त्याची ओळख. अक्षय रुपेरी पडद्यावर जसा दिसतो त्याच्या पूर्ण विरुद्ध जगणं तो दैनंदिन आयुष्यात जगतो.
अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्याशी अक्षयनं लग्नगाठ बांधली. ज्यानंतर ट्विंकलनं चित्रपटांतून काढता पाय घेत कुटुंबावर लक्ष दिलं.
सर्वसामान्य जोडप्यांप्रमाणंच अक्षय आणि त्याच्या पत्नीचं नातंही समजुतदारपणाच्या बळावर उभं आहे.
सहसा आपल्या खासगी आयुष्याबद्द हे दोघंही बोलताना दिसत नाहीत.
अक्षयचं घर, त्याचं राहणीमान, त्याचं बोलणं वागणं याविषयी नवं काही सांगण्याची गरज नाही.
राहिला मुद्दा या सेलिब्रिटी जोडीच्या मुलांच्या शिक्षणाचा...
आता फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या यादीत नाव येतं म्हणजे अक्षयच मुलांच्या शिक्षणाचा खर्च करत असेल, असा तुमचा समज होऊ शकतो.
पण, इथं परिस्थिती काहीशी वेगळी आहे. ट्विंकलनं मुलांची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. अगदी त्यांच्या शिक्षणाचा खर्चसुद्धा.
खुद्द तिनंच एका मुलाखतीमध्ये आपण मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च करत असल्याचा खुलासा केला.
आजही खिलाडी कुमार आणि ट्विंकलच्या संसारात खर्चाची वाटणी होते. इतकंच नव्हे, तर मुलांचा खर्च ट्विंकल करत असल्यामुळं मुलांच्या मनातही आईप्रती एक वेगळाच सन्मानही पाहायला मिळतो.