मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना सहसा त्यांच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असता. तुलनेने अक्षयची मुलं माध्यमं आणि सोशल मीडियावर तशी फार कमीच झळकतात. पण, ती जेव्हा जेव्हा सर्वांसमोर येतात तेव्हा तेव्हा त्यांची चर्चा मात्र कमाल होते.
सध्या खिलाडी कुमारचा मुलगा आरव चर्चेत आहे, ते म्हणजे एका सुंदर मुलीमुळं. तिच्यासोबतचे त्याचे फोटो इतके व्हायरल होत आहेत, की ही आहे तरी कोण असेच प्रश्न नेटकरी करताना दिसत आहेत.
आता ही मुलगी कोण, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खिलाडी कुमारच्या कुटुंबात डोकावल्यानंतरच मिळणार आहे. कारण, या मुलीचं त्याच्या कुटुंबाशी घट्ट नातं आहे.
अक्षय आणि ट्विंकल यांच्या कुटुंबात एक अशीही व्यक्ती आहे, जी माध्यमांसमोर फार क्वचितच येताना दिसते. ही व्यक्ती म्हणजे ट्विंटकलची बहीण रिंकी. ती गेली काही वर्षे लंडनमध्ये राहत आहेत. जिथं तिचं कुटुंबही वास्तव्यास आहे. (Bollywood Actor Akshay kumar niece naomi photos )
अक्षयच्या मुलासोबत ज्या मुलीचे फोटो व्हायरल होत आहेत, ती रिंकीचीच मुलगी आणि टविंकल- अक्षचची भाची नाओमिका आहे. भारतात नाओमिकाचं येणंजाणं सुरुच असतं. इथं आल्यावर ती, अक्षय- ट्विंकल आणि डिंपल यांच्यासोबत वेळ व्यतीत करताना दिसते.
हल्लीच नाओमिका तिची आजी, अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत दिसली होती. या दोघींनीही एकमेकींसोबत काही खास क्षण व्यतीत केले. यावेळी नाओमिकानं नूडल स्ट्रीप असणारा काळ्या रंगाचा टॉप आणि डेनिम असा लूक ठेवला होता. हातात तिनं हिरव्या रंगाची एक पर्स घेतली होती.
Bottega Veneta या इटालियन ब्रँड्या पर्सची किंमत जवळपास 1,94,086 रुपे इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. नाओमिका नेमकी किती फॅशनेबल आहे, हे तिच्या इन्स्टाग्राम पेजवरूनच लक्षात येत आहे. काय मग, कशी वाटली अक्षय कुमारच्या कुटुंबातील ही परदेशी पाहुणी?