का आली अजय देवगणवर ट्रोल होण्याची वेळ?

आता म्हणे.... 

Updated: Aug 1, 2019, 10:30 AM IST
का आली अजय देवगणवर ट्रोल होण्याची वेळ?  title=

मुंबई : सेलिब्रिटी कायमच त्यांच्या चाहत्यांशी एक वेगळं नातं बनवू पाहतात. यासाठी त्यांना मदत होते ती म्हणजे काही माध्यमांची. अशाच प्रभावी माध्यमांपैकी एक म्हणजे सोशल मीडिया. आगामी चित्रपट म्हणू नका किंवा मग खासगी आयुष्यातील एखादी महत्त्वाची गोष्ट. या माध्यमातून एका अर्थी कलाकार मंडळींच्या आयुष्यात डोकावण्याची संधीच प्रेक्षकांना मिळते. पण, अनेकदा हे डोकावणं काही मर्यादा ओलांडतं. परिणामी लहानसहान गोष्टींवरुन याच सेलिब्रिटींवर निशाणा साधण्यात येतो. 

सध्या अशाच परिस्थितीचा सामना करत आहे अभिनेता अजय देवगण. 'भुज- द प्राईड इंडिया' या चित्रपटामध्ये अजय गेल्या काही दिवसांपासून व्यग्र आहे. मांडवी येथे हल्लीच या चित्रपटातील गाण्याचं चित्रीकरण पार पडलं. ज्यानंतर अजय तेथीलच एका मंदिरात गेला. नागनाथ महादेव मंदिरात जात अजयने त्या ठिकाणी श्रद्धासुमनं अर्पण केली. सोशल मीडियावर या क्षणांचे फोटोही व्हायरल झाले. पण, याच फोटोंमुळे अजयवर अनेकांनीच नाराजीही व्यक्त केली. 

इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये अजय डेनिम शॉर्ट्स आणि टीशर्ट घातलेला दिसत आहे. ही एकच बाब पकडत त्याच्यावर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात झाली. 

 
 
 
 

જે લોકો અજય દેવગણના ચાહક હશે એ બધા જાણતા જ હશે કે અજય દેવગણ ભોળાનાથનો બોવ મોટો ભક્ત છે. ભુજમા શૂટીંગ ચાલી રહ્યુ છે એની ફિલ્મનું ત્યારે શ્રી યોગેશ બોક્ષા અજય દેવગણને આજે માંડવીના ખૂબ જૂના અને જાણીતા મહાદેવના મંદિર, નાગનાથ મહાદેવે લઇ ગયા. તસ્વીરમા મહાદેવની પૂજા કરતા ફિલ્મ અભિનેતા અજય દેવગણ અને શ્રી યોગેશ બોક્ષા. #BhujThePrideOfIndia #AjayDevgn

A post shared by Aditya Gadhavi (@adityagadhviofficial) on

तू मंदिरात असे कपडे घालून जाऊ शकत नाहीस असं म्हणत कोणी त्याला खडे बोल सुनावले, तर कोणी त्याची चूक निदर्शनास आणून दिली. इतकच नव्हे, तर त्याची खिल्लीही उडवली गेली. मुळात अजय स्वत: देवधर्म आणि रुढी परंपरांना अनन्यसाधारण महत्त्व देतो असं त्याच्या निकटवर्तीय सूत्रांकडून सांगण्यात आलं असून, त्या दिवशी चित्रीकरणानंतर तो मोकळ्या वेळेत मंदिरात गेल्याचं स्पष्ट करण्यात आलं.