दिग्दर्शकाच्या मदतीसाठी पुढे सरसावला खिलाडी कुमार

द ग्रेट अक्षय कुमार.... 

Updated: Feb 3, 2020, 01:30 PM IST
दिग्दर्शकाच्या मदतीसाठी पुढे सरसावला खिलाडी कुमार  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : चित्रपट वर्तुळात फक्त आपल्या चित्रपटांच्याच कामापुरता सीमीत न राहता अभिनेता अक्षय कुमार याने इतरही क्षेत्रांमधये कायमच सहभाग घेतला आहे. कोणा एका व्यक्तीला मदत हवी असल्यास क्षणाचाही विचार न करणाराही हाच तो खिलाडी कुमार. सध्या त्याने मदतीचा हात दिला आहे तो म्हणजे बॉलिवूडमधील 'मिशन मंगल' या चित्रपटाचे दिग्दर्शक जगन शक्ती यांना. 

काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या वृत्तानुसा जगन शक्ती यांची प्रकृती खालावली होती. ज्या कारणी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावली आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी म्हणून त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं आहे. 

रुग्णालयात असणाऱ्या शक्ती यांच्या उपचाराचा सर्व खर्च खुद्द अक्षय कुमार करत असल्याचं सांगण्यात येत आहे. एका पार्टीमध्ये जगन शक्ती यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले. ज्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अक्षयला जेव्हा शक्ती यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळाली, तेव्हा त्याने लगेचच आपल्या वतीने टीमला जगन शक्ती यांच्या उपचाराचा खर्च उचलण्यास सांगितलं. सोबतच त्यांच्या घरातीक कोणत्याही व्यक्तीला या साऱ्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, असंही सांगितलं. 

वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी

फक्त खिलाडी कुमारच नव्हे, तर कलासृष्टीतील अनेकांनीच जगन शक्ती यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. येत्या काळात शक्ती यांच्या मदतीसाठी खिलाडी कुमारप्रमाणे आणखी कोणी सेलिब्रिटी पुढाकार घेतं का, याकडे साऱ्यांचं लक्ष असेल. 

आताच्या आणखी काही सर्वात महत्त्वाची बातम्या

आसाममध्ये नदीला आग, तीन दिवसांपासून धगधगतेय

...आता पॅन कार्ड काढणं अधिक सोप्पं

जगातील कोणत्याच बाप-लेकीसोबत असं घडू नये

'महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग'

दिग्दर्शकाच्या मदतीसाठी पुढे सरसावला खिलाडी कुमार