बॉलिवूडमध्ये फ्लॉप, कमाईत अव्वल; अखेर समोर आला Abhishek Bachchan च्या संपत्तीचा आकडा

Abhishek bachchan कडे कोट्यवधींची संपत्ती, महागड्या कार्सची गर्दी   

Updated: Jan 31, 2022, 02:44 PM IST
बॉलिवूडमध्ये फ्लॉप, कमाईत अव्वल; अखेर समोर आला Abhishek Bachchan च्या संपत्तीचा आकडा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अनेक बॉलिवूड कलाकार आलिशान आणि इतरांना हेवा वाटेल असंच आयुष्य जगतात. बरं, येणाऱ्या प्रसिद्धीसोबत या कलाकारांच्या आवडीनिवडीही तितक्याच वेगळ्या. वेगळ्या म्हणण्यापेक्षा थक्क करणाऱ्या. अशाच कलाकारांमध्ये अभिनेता अभिषेक बच्चनचंही नाव येतं. 

बिग बी, अमिताभ बच्चन यांचा मुलगा म्हणून अभिषेकची ओळख आहेच. पण, त्यासोबतच त्याचं स्वत:चंही अस्तित्वं अनेकांनाच भारावून टाकणारं ठरत आहे. 

अनेक लक्झरी कार अभिषेककडे आहेत. यामध्ये ऑडी ए8एल, मर्सिडीज बेंज एसएल350डी, मर्सिडीज बेंज एएमजी, बेंटले कॉन्टिनेंटल अशा कारचा समावेश आहे. 

अभिषेकच्या संपत्तीचा आकडाही अखेर समोर आला आहे. जो ऐकून तुम्हीही चक्रावून जाल. 

कारण, हा आकडाच तितका मोठा आहे. अभिषेक तब्बल 203 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. बिझनेसमुळं तो प्रतिमहिना 2 कोटी रुपये कमवतो. 

दरवर्षी त्याच्या कमाईचा आकडा 24 कोटी रुपयांवर पोहोचतो अशीही माहिती समोर आली आहे. 

चित्रपटांमध्ये सक्रिय नसला, तरीही त्याच्या संपत्तीचा आकडा इतका कसा, असाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना? 

तर, जाहिराती आणि टीम फ्रँचायझीमुळं त्याच्या कमाईचा आकडा इतका वर गेला आहे. 

जवळपास 20 वर्षांपासून, कलाजगतामध्ये सक्रिय असणारा अभिषेक आता वेब जगताकडे वळला आहे. बॉम्बे स्कॉटिश आणि जमना बाई नर्सी या शाळांतून त्यानं प्राथमिक शिक्षण घेतलं. 

पुढे परदेशात जाऊन अभिषेकनं उच्चशिक्षण घेतलं आणि भारतात येऊन त्यानं बॉलिवूड गाठलं.