मुलीसमोरचं अभिनेत्रीला व्हायची मारहाण, 2 लग्नानंतरही तिला प्रेमात अपयश

वडील दारात येताना, पोलिस आलेले आणि आई पोलिसांकडे जाताना, सगळे काही तिला ठावूक आहे.

Updated: Jan 31, 2022, 02:17 PM IST
मुलीसमोरचं अभिनेत्रीला व्हायची मारहाण, 2 लग्नानंतरही तिला प्रेमात अपयश title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी अलीकडेच एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आली आहे. श्वेता करिअरपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.  श्वेताच्या आयुष्यातील काही अनपेक्षित पैलूंमुळे ती याआधीही खूप चर्चेत राहिली आहे. ज्याबद्दल अभिनेत्रीने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते. श्वेताचे पहिले लग्न राजा चौधरीसोबत झाले होते.

या लग्नापासून तिच्या घरी मुलगी पलक तिवारीचा जन्म झाला. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनी श्वेता आणि राजा यांच्यात मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजा श्वेताला अनेकदा मारहाण करायचा, त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला.

राजापासून घटस्फोट झाला तेव्हा श्वेता 27 वर्षांची होती. यानंतर श्वेताच्या आयुष्यात अभिनव कोहलीची एन्ट्री झाली, पण हे लग्नही फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले.

Shweta Tiwari shares bold photos in golden transparent dress | 40 की उम्र  में श्वेता तिवारी की बोल्डनेस ने मचाई हलचल, ट्रांसपेरेंट ड्रेस में दिखाया  हुस्न | Hindi News, Zee Hindustan Entertainment

अनुभव आणि श्वेता यांना एक मुलगा रेयांश आहे . मात्र, दोन अयशस्वी लग्नांबद्दल बोलताना श्वेताने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'मुलगी पलकने मला मारहाण करताना पाहिले आहे. तिने सर्व काही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. माझे पहिले लग्न तुटले तेव्हा ती फक्त 6 वर्षांची होती. तिने मला आघातात पाहिले आहे. वडील दारात येताना, पोलिस आलेले आणि आई पोलिसांकडे जाताना, सगळे काही तिला ठावूक आहे.

Shweta Tiwari - Latest News on Shweta Tiwari | Read Breaking News on Zee  News

श्वेता तिवारी पुढे म्हणते की, 'मध्यमवर्गीय कुटुंबात लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली जाते की तडजोड करा, जुळवून घ्या, लोक म्हणतात एक-दोन कानाखाली देणं सामान्य आहे पण माझ्या आईने मला हे सर्व शिकवले नाही. श्वेताची दोन्ही मुलं आज तिच्यासोबत राहतात.