सलमान खानच्या वकिलाला फोन - एसएमएसवरून धमकी..

काळवीट शिकार प्रकरणात आज जोधपुर न्यायालयाने सलमान खानच्या जामीनावर कोणताही निर्णय दिला नाही. सलमान खानला गुरूवारी (5 एप्रिल) रोजी 5 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला होता. 

Dakshata Thasale Updated: Apr 6, 2018, 11:44 AM IST
सलमान खानच्या वकिलाला फोन - एसएमएसवरून धमकी..  title=

जोधपुर : काळवीट शिकार प्रकरणात आज जोधपुर न्यायालयाने सलमान खानच्या जामीनावर कोणताही निर्णय दिला नाही. सलमान खानला गुरूवारी (5 एप्रिल) रोजी 5 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला होता. 

सलमान खानच्या वकिलांनी सत्र न्यायालयात जामीनाकरता धाव घेतली. मात्र आज सत्र न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नसून उद्या साडेदहा वाजता याबाबत निर्णय होणार आहे. यामुळे सलमान खानला आजची रात्र देखील कारागृहातच  जाणार आहे. या सगळ्या प्रकरणाची माहिती आहे. 

सलमान खानच्या वकिलांना धमकीचे फोन 

जोधपुर सत्र न्यायालयात सलमानची बाजू मांडणारे वकिल महेश बोरा यांना फोन आणि एसएमएसच्या माध्यमातून धमकी देण्याचा आल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. आजच्या जामीन अर्जाच्या सुनावणीला मी उपस्थि राहू नये अशी धमकी येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आजच्या सुनावणीला मी उपस्थित राहू नये यासाठी मला एसएमएस आणि इंटरनेट कॉल करुन धमकावण्यात आले आहे असे मेहश बोरा यांनी सांगितले. काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला पाचवर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून आज सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे. सलमानला कालची रात्री जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात काढावी लागली.

 अशी घालवली कारागृहातील रात्र 

जोधपुर मध्यवर्ती कारगृहात सलमान खानची पहिली रात्र भरपूर त्रासाची होती. शुक्रवारी कोर्टात जाण्या अगोदर सलमान खान वकिलांना भेटला. त्यावेळी त्यांच्यासोबत बॉडीगार्ड शेरा देखील उपस्थित होता. सलमानला जोधपूर येथील मध्यवर्ती कारागृहाच्या बराक क्रमांक २ मध्ये ठेवण्यात आले. त्याची ही बराक लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आसाराम बापूच्या शेजारीच असल्याचे कळते. तुरूंगात रवानगी होताच सलमानला कैदी नंबर १०६ ही ओळख मिळाली.  कालची अख्खी रात्र सलमानने अस्वस्थेत काढली.  तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री त्याने जेवणही केले नाही.  रात्री त्याना वरण-भात, कोबीची भाजी आणि चपाती दिली गेली. मात्र त्याने जेवणास नकार दिला. रात्री १२ वाजेपर्यंत सलमान त्याच्या बराकीबाहेर टेहळत होता.  यानंतर तो झोपायला बराकीत गेला.