सुष'माँ' स्वराज यांच्या निधनानी हळहळलं कलाविश्व

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली .

Updated: Aug 7, 2019, 11:56 AM IST
सुष'माँ' स्वराज यांच्या निधनानी हळहळलं कलाविश्व title=

मुंबई : भारत देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी मंगळवारी रात्री एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचं निधन झालं आणि सारा देश शोकसागरात बुडाला. त्या ६७ वर्षांच्या होत्या. नेहमी देशाच्या हितासाठी लढणाऱ्या सुषमा स्वराज यांनी अनुच्छेद ३७० रद्द झाल्याप्रकरणी ट्विटरच्या माध्यमातून आनंदही व्यक्त केला होता. तो त्यांचा अखेरचा ट्विट ठरला. 

तब्येतीच्या कारणामुळे सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी नकार दिला होता. देशाच्या लोकप्रिय नेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडकरांना देखील मोठा धक्क बसला आहे. बॉलिवूड कलाकारांनी त्यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली  वाहिली.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर, प्रसिद्ध गायक जावेद अख्तर पत्नी शबाना आजमी, अनुष्का शर्मा, रितेश देशमुख अर्जुन कपूर, आणि परिणीती चोप्रा यांच्या शिवाय अनेक कलाकारांनी त्यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.

रात्री १० वाजून ५० मिनिटांच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आलं. बुधवारी दुपारी ३ वाजता त्यांच्यावर लोधी रोड येथे असणाऱ्या स्मशानभूमीत त्यांच्यावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.