सुधीर मुनगंटीवार यांना भावली झी मराठीवरील 'ही' मालिका

मालिका राजकीय व्यक्तींच्याही पसंतीला 

Updated: Jul 17, 2020, 11:50 AM IST
सुधीर मुनगंटीवार यांना भावली झी मराठीवरील 'ही' मालिका title=

मुंबई : झी मराठीवरील प्रत्येक मालिका ही प्रेक्षकांसाठी खास आहे. या मालिकेतील अनेक पात्र प्रेक्षकांनी आपली वाटतं. मालिकेतील प्रश्नांशी प्रेक्षक मनापासून जोडला जातो. अशीच एक मालिका भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांना भावली आहे. 

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेने प्रेक्षकांच मन जिंकल आहे. आई-मुलाच्या नात्याची एक वेगळी बाजू या मालिकेने प्रेक्षकांसमोर मांडली आहे. मालिकेतील सासू अतिशय भाबडी दाखवली असून ती आपल्या मुलासाठी सगळं करते. असं असलं तरीही मुलाला प्रश्न हा पडतोच की,'आई कुठे काय करते?'

मुलाच्या याचप्रश्नावर त्याला चपखल बसेल असं उत्तर एका एपिसोडमध्ये दिलं आहे. जेव्हा अतिशय भाबडी आई ही मुलगा आणि सूनेच्या पगारापेक्षा अधिक रूपये कमवते. त्याचप्रमाणे सुधीर मुनगंटीवार यांनी देखील एक गोष्ट शेअर केली आहे. जेव्‍हा एखाद्याच्‍या घरी, भाकरीचे चारच तुकडे आहेत... आणि खाणारी तोंड पाच आहेत, तर त्‍या घरातली एकच व्‍यक्‍ती मला भूक नाही.... असे म्‍हणते ती म्‍हणजे.... ‘‘आई’’

अप्रतिम !!!!!! जेव्‍हा एखाद्याच्‍या घरी, भाकरीचे चारच तुकडे आहेत... आणि खाणारी तोंड पाच आहेत, तर त्‍या घरातली एकच व्‍यक्‍ती मला भूक नाही.... असे म्‍हणते ती म्‍हणजे.... ‘‘आई’’

Posted by Sudhir Mungantiwar on Monday, July 13, 2020

सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर केल्यामुळे झी मराठीने सुधीर मुनगंटीवार यांचे आभारच मानले आहेत. 

माननीय श्री. सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा मालिकेस एकप्रकारे पसंती दर्शवलेली आहे. धन्यवाद सर. #AggabaiSasubai #ZeeMarathi

Posted by zee marathi on Thursday, July 16, 2020

'अग्गंबाई सासूबाई'या मालिकेने सगळ्यांचीच मन जिंकली आहेत. या अगोदर स्मृती ईराणी यांनी देखील या मालिकेची दखल घेतली होती. आणि आपली पसंती दर्शवली होती.