हॅप्पी बर्थडे गुलजार : मॅकेनिक ते ऑस्कर पुरस्कार विजेता

छोट्या पडद्यासाठी 'मिर्झा गालिब' या सिरीयलचं दिग्दर्शनही त्यांनी केलं

Updated: Aug 18, 2018, 11:38 AM IST
हॅप्पी बर्थडे गुलजार : मॅकेनिक ते ऑस्कर पुरस्कार विजेता  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये गितकार, दिग्दर्शक, कवी, लेखक अशा विविध भूमिका जगणाऱ्या गुलजार यांचा आज वाढदिवस... १८ ऑगस्ट १९३४ रोजी जन्मलेल्या गुलजार यांचं संपूर्ण सिंह कालरा... झेलम जिल्ह्यातील दीनाशी ते संबंधित आहेत... विभाजनानंतर त्यांचं कुटुंब भारतात स्थायिक झालं. बॉलिवूडमध्ये पाय रोवून गीतकार म्हणून प्रसिद्धी मिळवण्यापूर्वी गुलजार यांना मॅकेनिक म्हणूनही काम करावं लागलं होतं. 

त्याकाळचे प्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांनी त्यांना 'बंदिनी'साठी पहिल्यांदा गीत लिहिण्याची संधी दिली... या सिनेमासाठी त्यांनी एक गीत लिहिलं... हे गाणं म्हणजे, मोरा गोरा अंग लइ ले, मोहे श्याम रंग दइ दे...  परंतु, यामुळे बिमल रॉय यांच्याशी घनिष्ठ संबंध जुळले... आणि त्यांची सिनेमात असिस्टंट डायरेक्टर म्हणून गुलजार यांना घेतलं. 

यानंतर गुलजार यांनी आँधी, किरदार यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं. छोट्या पडद्यासाठी 'मिर्झा गालिब' या सिरीयलचं दिग्दर्शनही त्यांनी केलं. 

गुलजार यांनी तब्बल २० फिल्मफेअर अॅवॉर्ड पटकावलेत. यातील ११ त्यांना बेस्ट गीतकार म्हणून मिळालेत तर ४ बेस्ट डायलॉग्जसाठी... गुलजार यांना 'जय हो' या गाण्यासाठी ऑस्कर अॅवॉर्डनंही सन्मानित करण्यात आलंय.