आज 'देसी गर्ल' प्रियांकाचा निकसोबत इंडियन स्टाईल साखरपुडा!

 प्रियांका आणि निक १८ ऑगस्ट रोजी आपल्या साखरपुड्याची अधिकृतरित्या घोषणा करण्याची शक्यता 

Updated: Aug 18, 2018, 12:07 PM IST
आज 'देसी गर्ल' प्रियांकाचा निकसोबत इंडियन स्टाईल साखरपुडा! title=

नवी दिल्ली : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास पुन्हा एकदा चर्चेत आहेत. सगळ्यांच्याच नजरा या दोघांवर टीकून आहेत. आत्तापर्यंत या दोघांच्या अफेअरच्या आणि डेटिंगच्या चर्चा जोरावर होत्या पण आता मात्र हे जोडपं लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं समजतंय. त्याचंच पहिलं पाऊल म्हणजे आज या जोडप्याचा साखरपुडा पार पडणार आहे. गुरुवारी रात्री उशिरा निक आपल्या आई-वडिलांसह भारतात दाखल झालाय. प्रियांकानं त्यांच्या स्वागतासाठी खूप तयारीही करून ठेवलीय. डीएनएनं दिलेल्या बातमीनुसार, प्रियांकानं आपल्या काही जवळच्या व्यक्तींना १८ ऑगस्ट रोजी आपल्यासाठी वेळ राखून ठेवण्याची विनंतीदेखील केलीय. यामुळेच प्रियांका आणि निक १८ ऑगस्ट रोजी आपल्या साखरपुड्याची अधिकृतरित्या घोषणा करण्याची शक्यता जोरावर आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियांका शनिवारी रात्री एका मोठ्या पार्टीत आपल्या साखरपुड्याची घोषणा करू शकते. आमची सहकारी वेबसाईट 'बॉलिवूड लाईफ'नं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी भारतीय परंपरेनुसार प्रियांका चोप्रा हिच्या घरी 'रोका'चा विधी पार पडू शकतो.  याच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निकचं कुटुंब भारतात दाखल झाल्याचं समजतंय. 

मीडियातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका आणि निक ऑक्टोबरमध्ये विवाह बंधनात अडकू शकतात.