मुंबई : (TV Actor Extra marital Affairs) बॉलिवूड असो किंवा मग छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटी बऱ्यात कलाकारांनी त्यांच्या साथीदाराला फसवलं आहे. बऱ्याच वेळा एखादा सेलिब्रिटी विवाहित असताना एका सिक्रेट रिलेशनशिपमध्ये असल्याचे ऐकले आहे. आज आपण अशाच सिक्रेट रिलेशनशिपविषयी जाणून घेणार आहोत. जे विवाहित असूनही त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करत दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. पण काही कलाकार तर रिलेशनशिपमध्ये असताना दुसऱ्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये आले.
अविनाश सचदेव - अविनाश सचदेव (Avinash Sachdev) आणि रुबीना दिलेक (Rubina Dilaik) प्रेमात होते. रुबिनाला अविनाशशी लग्न करायचं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा रुबीनाला समजलं की अविनाश तिची फसवणूक करत असून तो दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तेव्हा तिनं हे रिलेशनशिप संपवण्याचा निर्णय घेतला.
करण सिंग ग्रोवर - करण सिंग ग्रोवरनं (Karan Singh Grover) एकदा नव्हे तर दोनदा फसवणूक केली आहे. करणचं पहिलं लग्न श्रद्धा निगमसोबत झालं होतं, जे फक्त 10 महिने टिकलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करणनं 'झलक दिखला जा' मध्ये असलेल्या त्याच्या कोरिओग्राफर निकोलसोबत रिलेशनशिपमध्ये होता. करणनं जेनिफर विंगेटशी (Jennifer Winget) दुसरं लग्न केलं जिची फसवणूक त्यानं तिसरी पत्नी बिपाशा बसूसाठी (Bipasha Basu) केली.
करण पटेल - करण पटेल (Karan Patel) आज एक आनंदी विवाहित आयुष्य जगत असून तो लवकरच वडील देखील होणार आहे. पण एक काळ असा होता जेव्हा तो काम्या पंजाबीसोबत (Kamya Punjabi) एका Serious Relationship मध्ये होता. मात्र, एकीकडे काम्या लग्नाची स्वप्ने सजवत होती, तर दुसरीकडे करणनं तिच्याशी ब्रेकअपं केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करणनं काम्याला फसवून अंकिता भार्गवशी लग्न केलं.
एजाज खान - एक काळ असा होता जेव्हा एजाज खान (Eijaz Khan) आणि अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि त्यांना लग्नही करायचं होतं. मात्र, काही वर्षांनंतर दोघांच्या ब्रेकअपच्या बातमीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याच वेळी, एजाजनं एका शोमध्ये कबूल केले की त्यानं अनिताची फसवणूक केली आणि याचा त्याला नेहमीच पश्चाताप होईल.
कृष्णा अभिषेक - सात वर्षांच्या अफेअरनंतर कृष्णानं (Krushna Abhishek) कश्मीरा शाहशी (Kasmera Shah) लग्न केलं हे सर्वांनाच माहीत आहे. दोघेही 2017 मध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे पालक झाले. पण काही लोकांना माहित आहे की, काश्मीरासोबत लग्न करण्यापूर्वी कृष्णाचं तनुश्री दत्तासोबत (Tanushree Dutt) अफेअर होतं. पण जेव्हा कश्मीराला हे कळालं तेव्हा तिनं कृष्णाला अल्टीमेटम दिला. त्यानंतर लगेचच कृष्णाने कश्मीराशी लग्न केलं. (Krushna Abhishek Cheat Kasmera Shah)
सुशांत सिंग राजपुत - सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) यांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. जवळपास 7 वर्षे डेट केल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशांतनं क्रिती सेननसाठी (Kriti Sanon)अंकिताची फसवणूक केली होती.