Bipasha Basu Baby: बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरला कन्या रत्न!

Bipasha Basu Welcomes Daughter: आलिया पाठोपाठ बिपाशानेही मुलीला जन्म दिला आहे. 

Updated: Nov 12, 2022, 03:10 PM IST
Bipasha Basu Baby: बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरला कन्या रत्न! title=

Bipasha Basu Welcomes Daughter: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूनं (Bipasha Basu)आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) यांनी ऑगस्टमध्ये फोटो शेअर करत तिच्या प्रेग्नंसी विषयी सांगितले होते. बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हरचं हे पहिलं मुल आहे. तेव्हापासून बिपाशा सतत तिच्या प्रेग्नंसी विषयी सोशल मीडियावर बोलताना दिसली. ते दोघेही त्यांच्या बाळाची आतुरतेनं अपेक्षा करत होते. आजा बिपाशानं मुलीला जन्म दिला आहे.  

फॅमिली प्लनिंगविषयी बोलताना बिपाशा हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की 'ती आणि करण साथीच्या आजारापूर्वी बाळासाठी प्रयत्न करत होते, परंतु नंतर कोरोना आला आणि त्यांनी यावर विचार करणं सोडलं. ती पुढे म्हणाली, “2021 मध्ये आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आणि देवाच्या कृपेनं मी गरोदर झाले.' 

बिपाशा आणि करण यांनी ऑगस्टमध्ये ती प्रेग्नंट असल्याचे सांगत काही फोटो शेअर केले होते. तर एका मुलाखतीत बोलताना बिपाशा म्हणाली होती की तिला आणि करणला मुलगी हवी आहे. करण आणि मी सुरुवातीपासूनच स्पष्ट होते. वयाच्या 43 व्या वर्षी बिपाशानं तिच्या मुलीला जन्म दिला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गरोदरपणाबद्दल बोलताना ती म्हणाली होती की, 'मला माहित आहे की मुलं ही एक सुंदर भेट आहे आणि आपण कोणत्याही लिंगाचा स्वीकार केला पाहिजे. परंतु आम्ही आमच्या बाळाला 'ती' म्हणतो. आमचा विश्वास आहे की, ती मुलगी आहे आणि जेव्हापासून आम्ही मूल होण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून आमचा हाच विश्वास आहे.' (Bipasha Basu and karan singh grover Welcomes baby girl) 

Bipasha Basu and karan singh grover Welcomes baby girl

बिपाशा आणि करण यांची पहिली भेट 2015 मध्ये चित्रपटाच्या सेटवर झाली होती. चित्रपटाच्या सेटवर सुरू झालेल्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर करण आणि बिपाशाने एप्रिल 2016 मध्ये त्यांच्या रिलेशनशिपला नाव देण्याचा निर्णय घेतला. आता जवळपास 6 वर्षांच्या लग्नानंतर हे जोडपं पालक बनणार आहे.