या दिवशी प्रदर्शित होणार 'पीएम नरेंद्र मोदी'; उलगडणार मोदींचा जीवनप्रवास

चित्रपटात पीएम मोदी यांच्या गुजरातचे मुख्यमंत्री ते 2014 पर्यंतचा ऐतिहासिक विजय दाखवण्यात आला आहे.

Updated: Mar 15, 2019, 04:40 PM IST
या दिवशी प्रदर्शित होणार 'पीएम नरेंद्र मोदी'; उलगडणार मोदींचा जीवनप्रवास title=

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते उमंग कुमार दिग्दर्शित 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट 12 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात गुजरातच्या मुख्यमंत्र्यापासून ते 2014 च्या निवडणूकांमधील ऐतिहासिक विजय आणि शेवटी पंतप्रधान बनण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. 

अहमदाबाद, कच्छ-भुज आणि उत्तराखंड मध्ये चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर शेवटच्या भागातील चित्रिकरण मुंबईत करण्यात आले आहे. निर्माते संदीप सिंह यांनी 'हा एक खास चित्रपट आहे. आणि ही एक अशी गोष्ट आहे जी सांगितली गेली पाहिजे. मला विश्वास आहे की, चित्रपटात दाखवण्यात आलेली ही गोष्ट प्रेक्षकांना नक्की प्रेरित करेल' असे त्यांनी म्हटलं आहे.

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात अभिनेता विवेक ओबरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. याव्यतिरिक्त चित्रपटात दर्शन कुमार, बोमन ईरानी, मनोज जोशी, जरीना वहाब, बरखा बिश्त सेनगुप्ता हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.