Pathaan च्या सेटवरील Deepika Padukone चे बिकीनी फोटो सोशल मीडियावर लीक

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'पठाण' चित्रपटाच्या शूटींगसाठी सध्या स्पेनमध्ये आहे.

Updated: Mar 19, 2022, 09:10 PM IST
Pathaan च्या सेटवरील Deepika Padukone चे बिकीनी फोटो सोशल मीडियावर लीक title=

Deepika Padukone Bikini Photos : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा चित्रपट 'पठाण' सध्या चर्चेत आहे. या चित्रपटासाठी ती शाहरुख खानसोबत स्पेनमध्ये शूटिंग करत आहे. पण या दरम्यान तिचे काही बोल्ड फोटो समोर आले होते. आता पुन्हा एकदा दीपिका पदुकोणच्या चित्रपटाच्या सेटवरील बोल्ड फोटो लीक झाले आहेत. ती ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटेड बिकिनीमध्ये दिसत आहे

2007 मध्ये दीपिका पदुकोणने शाहरुख खानसोबत 'ओम शांती ओम' या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर तिने शाहरुख खान सोबत अनेक चित्रपट केले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KRISHNA KUMAR (@filmybuddyytv)

शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये शाहरुख खान शर्टलेस दिसत होता आणि यासोबतच त्याचा हिरवा ट्राउझर्स आणि लांब केसांचा लूकही अप्रतिम दिसत होता.

दीपिका पदुकोणच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची दिग्दर्शक शकुन बत्राच्या 'गहराइयां' चित्रपटात अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसली होती. हा चित्रपट 11 फेब्रुवारी रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. आता दीपिका पदुकोण दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या 'पठाण' चित्रपटात शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय ती सिद्धार्थ आनंदच्या फायटर या चित्रपटात हृतिक रोशनसोबत काम करताना दिसणार आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे.