नाईट ड्रेसमध्ये करिना-करिश्मा पोहचल्या एअरपोर्टवर, व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री बहिणी करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर यांनी अलीकडेच नताशा पूनावालासोबत मालदीवची 'क्विक ट्रिप' केली.

Updated: Mar 19, 2022, 08:58 PM IST
नाईट ड्रेसमध्ये करिना-करिश्मा पोहचल्या एअरपोर्टवर, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : बॉलीवूडमधल्या सगळ्यात सुंदर अभिनेत्री बहिणी करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर यांनी अलीकडेच नताशा पूनावालासोबत मालदीवची 'क्विक ट्रिप' केली. या तिन्ही सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडियावर या ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर, करीना आणि करिश्मा सुट्टीचा आनंद घेवून भारतात परतल्या आहेत. मात्र दोन्ही बहिणी एअरपोर्टवर स्पॉट होताच सोशल मीडियावर युजर्स त्यांना ट्रोल करतायेत. याचं कारण म्हणजे, दोघीही यावेळी एअरपोर्टवर नाईटसूटमध्ये स्पॉट झाल्या.

पैजामा सेटमध्ये दिसल्या करीना आणि करिश्मा
खरंतर, अलीकडेच सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर आपल्या मुलांसोबत एअरपोर्टवर दिसत आहेत. दोन्ही बहिणींनी प्रिंटेड पायजमा सेट घातला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर करीना लवकरच आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसणार आहे. 'लाल सिंग चड्ढा' व्यतिरिक्त करिनाने तिच्या ओटीटी पदार्पणाचीही घोषणा केली. बुधवारी, 16 मार्च रोजी सकाळी तिने जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांच्यासोबतच्या तिच्या नवीन थ्रिलर चित्रपटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'कहानी' फेम सुजॉय घोष करणार आहेत.