'तू फेक आहेस', निक्की तांबोळी आणि छोटा पुढारीमध्ये भांडण!

Nikki Tamboli and Chota Pudhari Fight : निक्की तांबोळी आणि छोटा पुढारीमध्ये रक्षाबंधनच्या दिवशी झालं भांडण...

दिक्षा पाटील | Updated: Aug 19, 2024, 03:46 PM IST
'तू फेक आहेस', निक्की तांबोळी आणि छोटा पुढारीमध्ये भांडण! title=
(Photo Credit : Social Media)

Nikki Tamboli and Chota Pudhari Fight : 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व सुरु झालं आहे. जेव्हा पासून हा सीझन सुरु झाला आहे तेव्हापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक हे काही ना काही करत चर्चेचा विषय ठरतात. त्यात सगळ्यात जास्त चर्चा असते ती म्हणजे स्पर्धक निक्की तांबोळी आणि घन:श्यामची... निक्की तांबोळी ही घन:श्यामला भाऊ मानते. त्या दोघांमध्ये किती चांगलं भावा-बहिणीचं नात आहे हे आपण पाहिलं. मात्र, आता रक्षाबंधन येताच त्या दोघांमध्ये वाद झाला आहे. त्या दोघांच्या नात्यात कशामुळे फूट पडली हे जाणून घेऊया. 

सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत त्या दोघांमध्ये वाद होत असल्याचं आपण पाहिलं. आता याचं नेमकं कारण काय हे काही कळलेलं नाही. व्हायरल होत असलेल्या या प्रोमोमध्ये निक्की घन:श्यामला बोलते की 'तू फेक आहेस' हे ऐकताच घन:श्याम अर्थात छोटा पुढारी रागात तिच्या जवळ जातो आणि बोलतो 'काय फेक वागलो सांग ना तू मला? खरंतर तू किती होपलेस आहेस हे अख्ख्या जनतेला दिसतंय. अगं तुला सख्ख्या बहिणीचा दर्जा दिला, जा नाही देत.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'ती मुलगी राखी बांधेल म्हणून मी शाळेतच जात नव्हतो पण भांडण नाही केलं बाबा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'बहीण आणि भावाचे होपेलेस प्रेम.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'या दोघांना लास्ट पर्यंत घरात असूद्या..... तेवढं च एन्टरटेनमेंट.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'निकीला सबक फक्त राखी सावंत हिच शिकवू शकते, आणि जर ती या घरात आली तर खेळ पालटूनच जाणार.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'स्क्रिप्टेड आहे रक्षाबंधन ड्रामा.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मला वाटलं त्यानं निकीचं काम ऐकलं नाही.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'मला असं वाटतं की हा निकी आणि घनश्यामचां नवीन प्लॅन असेल, लवकरच ते आपल्या सगळ्यांना कळेल.'

हेही वाचा : 'बिग बींना लांबूनच नमस्कार, त्यांच्यासोबत काम करणार नाही...' इम्तियाज अलीचं विधान चर्चेत

तर ‘बिग बॉस मराठी’बद्दल सांगायचं झालं, तर नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर डबल एविक्शन झालं. यावेळी योगिता चव्हाण आणि निखिल दामले यांनी बिग बॉसच्या घरातून निरोप घेतला.